Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, डिसेंबर २५, २०२१

चंद्रपूर शहरातून निघाली श्री. संत संताजी जगनाडे महाराज जयंती महोत्सव रथयात्रा; पालकमंत्री, खासदार, आमदार यांची उपस्थिती

चंद्रपूर शहरातून निघाली श्री. संत संताजी जगनाडे महाराज जयंती महोत्सव रथयात्रा; पालकमंत्री, खासदार, आमदार यांची उपस्थिती



तेली समाजाचे आराध्यदैवत, समाज सुधारक संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आज शनिवारी २५ डिसेंबर रोजी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यांच्या वतीने शहराच्या प्रमुख मार्गाने रथयात्रा निघाली. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

पठाणपुरा येथील जोडदेऊळ चौकातील श्री. संत संताजी जगनाडे महाराज स्मारक येथे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार रामदार तडस यांनी पूजन केल्यानंतर रथयात्रा प्रारंभ झाली. ती गांधी मार्गाने निघून जटपूरा गेट येथे पोहचल्यावर पुष्प वर्षाव करण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, कॉंग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, नगरसेवक नंदु नागरकर, विदर्भ तैलिक समाजाचे अध्यक्ष बबनरावजी फंड, माजी महापौर संगीता अतृतकर, नगरसेविका छबू वैरागडे, वासुदेव देशमूख, अजय वैरागडे, सुरेश वैरागडे यांची उपस्थिती होती. त्यांनतर ही रथयात्रा पंचतेली हनुमान मंदिर येथे पोहचून समारोप  करण्यात आला. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.