Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, डिसेंबर २७, २०२१

स्थानिक स्वराज्य संस्था वॉर्ड रचनेबाबत सरकारचा निर्णय तुघलकी : आमदार सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत टीका


स्थानिक स्वराज्य संस्था वॉर्ड रचनेबाबत सरकारचा निर्णय तुघलकी : आमदार सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत टीका



दोन नगरसेवकांचा प्रभाग पुर्वीपासूनच योग्य निर्णय होता. परंतु महाविकास आघाडी सरकारने भीतीपोटी हा निर्णय फिरविला. स्थानिक स्वराज्य संस्था वॉर्ड रचनेबाबत सरकारने तुघलकी निर्णय घेतल्याची टीका महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केला. 27 डिसेंबर रोजी विधानसभेत शासकीय विधेयकावरील चर्चेदरम्यान ते बोलत होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये थेट नगराध्यक्ष निवडीची पद्धत भाजप सरकारने सुरू केली होती. परंतु महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय फिरविला. यामागे पूर्णपणे राजकीय हेतू होता. या निर्णयातून जनतेचे नुकसान होत आहे. वॉर्डांची पुनर्रचना करताना आमदारांची समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.