भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक प्रेरणादायी केंद्र ठरावे : आमदार सुधीर मुनगंटीवार
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडले जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन
चंद्रपूर : विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी भगवान बिरसामुंडा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरराष्ट्रीय जनजाती दिवस घोषीत करून त्यांना ख-याअर्थाने आदरांजली दिली आहे. चंद्रपूरच्या महापौरांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या महत्वाच्या विकासकामांपैकी भगवान बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरणाचे काम आहे. आदिवासी बांधवांनी या कामाचा पाठपुरावा करावा असे माझे त्यांना नम्र आवाहन आहे. भगवान बिरसा मुंडा यांचे हे स्मारक आपल्याला प्रेरणा देणारे केंद्र ठरावे, अशी अपेक्षा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
चंद्रपूर रेल्वे स्थानक गेटसमोर चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने जननायक बिरसा मुंडा चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार असून, त्याचा भूमिपूजन सोहळा गुरुवार, दिनांक 16 डिसेंबर रोजी माजी अर्थमंत्री, लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडला.
या कार्यक्रमाला चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, नगरसेवक सुभाष कासनगोटुवार, सभागृह नेता देवानंद वाढई, महिला व बालकल्याण समिती सभापती पुष्पा उराडे, महिला व बालकल्याण समिती उपसभापती शीतल कुळमेथे, गटनेत्या जयश्री जुमडे, नगरसेवक रवी आसवानी, नगरसेविका चंद्रकला सोयाम, नगरसेविका माया उईके, नगरसेविका ज्योती गेडाम, नगरसेविका शीतल आत्राम, नगरसेवक प्रदीप किरमे, भाजपचे नेते प्रकाश धारणे, सामाजिक कार्यकर्ते अशोक तुमराम, जयप्रकाश खोब्रागडे, राजू भगत, रवि लोणकर यांची उपस्थिती होती.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यकरण करण्यासाठी आदिवासी समाजबांधवांसह नगरसेविकानी मागणी केली होती. त्यानुसार रेल्वेस्थानक गेटसमोर शासकीय जागेवर सौंदर्यीकरण करण्यासाठी मनपाने मंजुरी प्रदान केली. त्यांचे भूमिपूजन माजी अर्थमंत्री, लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.
ावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, मी अर्थमंत्री असताना मिशन शौर्यच्या माध्यमातुन चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट हे शिखर सर केले. आदिवासीबांधव प्रामाणिक व जिद्दी आहे. एकलव्य हे त्याचे उत्तर उदाहरण आहे. आदिवासीबहुल ग्रामपंचायतींना बजेटच्या ५ टक्के निधी थेट देण्याचा निर्णय आमच्या सरकारच्या काळात आम्ही घेतला होता. १८५८ च्या स्वातंत्र्य लढयात ब्रिटीशांशी निकराने झुंज देणारे शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ टपाल तिकीट प्रकाशित करण्यासाठी मी केंद्र सरकारशी यशस्वी संघर्ष केला. शहरातील ज्युबिली हायस्कुल परिसरात शहीद बाबुराव शेडमाके इनडोअर स्टेडियम बांधकामासाठी निधी मंजूर करविला. भारतीय जनता पार्टीने आदिवासी बांधवांचे हित नेहमी जपले आहे. भगवान बिरसा मुंडा यांचे हे स्मारक आधुनिक क्रांती ठरो अशी अपेक्षा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाला आदिवासी बांधवांची मोठया संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन धनराज कोवे यांनी केले.
@SMungantiwar
Beautification of Birsa Munda Chowk Bhoomi Pujan