संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.१९ डिसेंबर:-
गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन नवेगावबांध अंतर्गत पथसंचलन व दंगा काबू योजना अंतर्गत रंगीत तालीम १८ डिसेंबर रोज शनिवारला घेण्यात आली. पोलीस स्टेशन पासून ते गावाच्या मुख्य रस्त्यावरून टी पॉईंट चौकापर्यंत हे पथ संचालन पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले.येथील आझाद चौक येथे दंगा नियंत्रणाची प्रात्यक्षिके पोलीस जवानांनी सादर केले. २१ डिसेंबर मंगळवार ला होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये व निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी हे पथ संचालन व दंगा नियंत्रण रंगीत तालीम घेण्यात आली. हे येथे उल्लेखनीय आहे. पथ संचालनाचे नेतृत्व पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर यांनी केले.
पथसंचलनात १८ अंमलदार व विशेष पथकाचे २७ अंमलदार तसेच भारतीय रिझर्व बलाचे गट क्रमांक १५
कंपनी ए २ चे दोन अधिकारी व ५९ अंमलदार सहभागी झाले होते.