Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, डिसेंबर ०३, २०२१

२५ लाख रुपये देण्याचा शब्द न पाळल्याने नऊ सरपंच व तीन उपसरपंचांनी दिला राजीनामा |

२५ लाख रुपये देण्याचा शब्द न पाळल्याने नऊ सरपंच व तीन उपसरपंचांनी दिला राजीनामा 



चंद्रपूर (chandrapur)-  प्रत्येक ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये देण्याचा शब्द न पाळल्याने ब्रम्हपुरी (Bramhapuri) तालुक्यातील नऊ सरपंच व तीन उपसरपंचांनी सदस्यत्वाचा सामूहिक राजीनामा ( resigned) दिला आहे. ऐन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर या राजीनाम्यांनी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. 


मागील सात-आठ वर्षांपासून तालुक्यात काँग्रेसची पकड मजबूत झाली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. चिमूर तालुक्यात काही गावांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीवेळी पालकमंत्र्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीला विकासकामांकरिता २५ लाख रुपये देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अद्यापही ही रक्कम मिळालेली नाही. तसेच काँग्रेस कमिटीकडून कोणतीही कामे होत नाहीत, असा आरोप करत तालुकाध्यक्ष तिडके यांच्याकडे सरपंच, उपसरपंच यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यात संजय राऊत तोरगव बु, राकेश पिलारे कलेता, शरद अलोणे तोरागाव खु., सुधीर पिलारे बेलागाव, प्रवीण बांडे नांदगाव, सुरेश दुनेदार पिंपळगाव, राजू नान्हे काहाली, अर्चना डेंगे खंडाळा, प्रेमानंद गेडाम सोनेगाव या सरपंचांसह नरेश राऊत कालेता, नंदकिशोर रखडे खंडाळा या उपसरपंचांचा समावेश आहे. 



Nine sarpanches and three deputy sarpanches resigned for not keeping their word of Rs 25 lakh


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.