नगरपंचायत व नगर परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवाराच्या तिकीट वाटप संदर्भात बैठक पार पडली
चंद्रपूर जिल्ह्यातील 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपंचायत व नगर परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवाराच्या तिकीट वाटप संदर्भात मुंबई पक्ष कार्यालयात राज्य निवड मंडळाची बैठक पार पडली.
जिल्ह्यातील सावली, पोंभूर्णा, गोंडपिंपरी, कोरपना व जिवती नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी टिळक भवन मुंबई येथे संपन्न झाली.यामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीसंदर्भात संपूर्ण उमेदवाराबद्दल आढावा व माहिती देण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा आमदार नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांची उपस्थिती होती.
शनिवार, दि. 4 डिसेंबर 2021 रोजी पलिकमंत्री वडेट्टीवर सकाळी 11 वाजता सावली येथे नगरपंचायत निवडणूक संदर्भाने पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा. दुपारी 1.30 वाजता सिंदेवाही येथे आगमन व नगरपंचायत निवडणूक संदर्भाने पदाधिकारी यांच्यासमवेत चर्चा करणार आहेत