Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, डिसेंबर ०३, २०२१

सराफा व्यवसायी जनार्दन पोवळे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन.


सकाळी १०.०० वाजता अंत्यसंस्कार.






संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.३ डिसेंबर:-

येथील सराफा व्यवसायिक जनार्दन रामचंद्र पोवाळे वय वर्ष ६१ यांचे आज(दि.३) दुपारी ३.३० वाजे दरम्यान दुकानातच हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले, नातवंड व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या मनमिळावू व मृदू स्वभावामुळे  त्यांच्या आकस्मिक निधनानेे नवेगावबांध व परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या (४डिसेंबर शनिवारी) सकाळी १०.०० वाजता स्थानीक मोक्षधामावर अंंतिम संस्कार करण्यात येईल.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.