Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, डिसेंबर ०६, २०२१

नागपूर कळमना प्रभाग ४ मधील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश



नागपूर कळमना प्रभाग ४ मधील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश




महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर येथील कळमना परिसरातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते 
*श्री.राजुभाऊ सांभारे* व *श्री उमेशभाऊ भस्मे* यांचेसह अनेक तरुण मंडळींनी *श्री राजसाहेब ठाकरे* यांच्या विचारांनी प्रेरित होऊन *प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी* यांच्या नेतृत्वात मनसेत प्रवेश केला.
याप्रसंगी *मनसे शहर अध्यक्ष श्री अजय ढोके व श्री विशाल बडगे* प्रामुख्याने उपस्थित होते. 
मनसे *उपशहर अध्यक्ष श्री प्रशांत निकम* यांनी या पक्ष प्रवेश कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. यावेळी उपस्थित असलेले मनसे पदाधिकारी शहर उपाध्यक्ष *रजनीकांत जिचकार*, उत्तर विभाग अध्यक्ष *उमेश बोरकर*, दक्षिण - पश्चिम विभाग अध्यक्ष *तुषार गिऱ्हे*,  रोजगार व स्वयंरोजगार सेलचे शहर संघटक *नितीन बंगाले*, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष *गौरव पुरी*, उत्तर विभाग संघटक *सागर लारोकार*, प्रभाग अध्यक्ष *प्रवीण बावणे*, शाखा अध्यक्ष *आमिन खान*, विभाग उपसंघटक *सचिन निमजे*, *राजीव पोलाखरे* यांनी मनसेत प्रवेश करणाऱ्या सर्व तरुणांचे पुष्प आणि मनसेचा दुपट्टा घालून स्वागत केले.
महानगर पालिका निवडणुका जवळ आल्या आहेत, अधिक जोमाने काम करा, जनतेचा आशीर्वाद नक्की मिळेल असा सल्ला प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांनी उपस्थित पदाधिकारी आणि पक्ष प्रवेश घेणाऱ्या नवोदित सभासदांना दिला व सर्व नवोदित सभासदांना मनसेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मनसेत सामील होऊन आमचा उत्साह अधिक वाढला असे मत पक्ष प्रवेश घेणाऱ्या सभासदांनी यावेळी व्यक्त केले.
*सर्वश्री सुरेश वर्मा, संतोष पटले, अरुण पटले, सोहम चौधरी,अखिलेश तिवारी, भरत वाढपाल्लीवर, गोपाळराव मते , दीपक कांबळे, शेखर नंदनकर , कपिल पडोळे , वैभव कावळे, विनीत येवले, पीयूष मुळे, मनीष सेन, नरेश कटरे , पवन हिंगणेकर , प्रदीप बडगे , अमरचंद बल्लारे, जनार्दन गवते , अमित ठाकूर , तेजवान तिवारी, अनिल कावळे , सुनील कावळे, निखिल पडोळे , सुनील येवले, अजय सूर्यवंशी, चिकू बोकडे,* यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी मनसेचे सभासदत्व स्वीकारले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.