जनता महाविद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिवस कार्यक्रमाचे आयोजन
चंद्रपूर येथील चांदा शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित जनता महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे दिनांक 18 डिसेंबर रोजी अल्पसंख्यांक दिवस संस्थेचे सचिव डॉ. अशोक जिवतोडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष यांच्या मार्गदर्शनात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. आशीष महातळे तसेच कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. योगेश दुधपचारे यांची उपस्थिती होती. मंचावर डॉ. रणजित वानखडे, प्रा. कमलाकर धानोरकर, नॅक समन्वयक डॉ. नाहिदा बेग, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर बल्की तसेच प्रा. गणेश येरगुडे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. योगेश दुधपचारे यांनी भारतातील अल्पसंख्यक नागरिक यांना भारतीय घटनेच्या माध्यमातून अल्पसंख्याकांना पूर्ण अधिकार मिळण्यासाठी, समान अधिकार आणि दर्जा मिळण्यासाठी अशा कार्यक्रमाची गरज असल्याचं मत मांडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रणजित वानखडे यांनी केले, आपल्या प्रास्ताविकातून डॉ. रणजित वानखडे यांनी भारतात राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवस का गरजेचा आहे याबाद्द्दल मत मांडले. अध्यक्षीय भाषणातून डॉ. आशिष महातळे यांनी संपूर्ण जगातील आजची अल्पसंख्यांकांची स्थिती आणि त्यांच्यावर होणारे परिणाम, त्याबद्दल केले जाणारे जागतिक स्तरावरील प्रयत्न समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. अमर बल्की यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. गणेश येरगुडे यांनी केले, कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.