Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, डिसेंबर १५, २०२१

लाखो शिवभक्तांनी घेतले बाबा विश्वनाथचे दर्शन




चंद्रपुरात झाले 'भव्यकाशी-दिव्यकाशी'चे थेट प्रसारण




माजी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती

भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूरच्या वतीने महानगरातील अनेक मंदिरात भव्य स्क्रीनवर,वाराणसी येथील श्री काशी विश्वनाथ धामच्या नवनिर्माण,पुनर्रविस्तार लोकार्पण सोहळ्याचे सोमवार(13 डिसेंबर)ला थेट प्रसारण करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते दु 1.48 वाजता बाबा विश्वनाथ (शिव)ला अभिषेक केल्यानंतर,शिलालेखचे अनावरण करून,श्री काशी विश्वनाथ धाम विश्वार्पित करण्यात आले.हा ऐतिहासिक सोहळा सर्वांना अनुभवता यावा म्हणून महानगर भाजपा तर्फे,श्री अंचलेश्वर मन्दिर,स्वामी समर्थ मन्दिर,जगन्नाथबाबा मन्दिर,राधाकृष्ण मन्दिर,हनुमान मंदिर,येथे विषेश आयोजन करण्यात आले.
विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आ सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री अंचलेश्वर मन्दिर येथे नागरिकांनी थेट प्रसारणचा लाभ घेतला यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे,महामंत्री ब्रिजभूषण पाझरे,रविंद्र गुरनुले,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,महापौर राखी कंचर्लावार,उपमहापौर राहुल पावडे,स्था.समिती सभापती संदीप आवारी,विशाल निंबाळकर,राजू गोलिवार,प्रदीप किरमे,डॉ शैलेंद्र शुक्ला,मनोज मालवीय,हेमंत गुहे,राजकुमार पाठक,किरण बुटले,भारती दुधानी,माया मांदाळे,प्प्रभाताई गुळधे,विनोद शेरकी,रितेश वर्मा,रामकुमार अकापेलीवार,संदीप आगलावे,प्रीती भूषणवार,हरीश मचंलवार,शीतल गुरनुले,डॉ कल्पना गुलवाडे आदींची उपस्थिती होती.

*11 ब्रह्मवृंदाने केला रुद्राभिषेक*

आ.मुनगंटीवार यांनी सकाळी बाबूपेठ येथील शिवमंदिरात पूजाअर्चा केल्यावर 11 वाजता अंचलेश्वर मन्दिर येथे पुरोहित संदीप अंदनकर यांच्या नेतृत्वातील 11 ब्राह्मवृंदाच्या समवेत रुद्राभिषेक केला.यावेळी शंखनादही करण्यात .

*दिव्य काशीचे आजही महात्म्य...आ.मुनगंटीवार*

12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतीर्लिंग म्हणजे काशी विश्वानाथ ,अयोध्येचे प्रभू राम व मथुरेचा कृष्ण हे आपल्या आस्थेचे प्रतीक आहेत.आजही काशीला महत्व आहे.काशीला मोक्ष प्राप्त होतो ही आपली कल्पना आहे.ज्या काशी विश्वनाथ मंदिराला ध्वस्त करण्यासाठी मुगलांनी अयशस्वी प्रयत्न केला,ती काशी आमच्यासाठी आस्थेचे पवित्र ठिकाण आहे.आज दिव्यकाशी भव्य काशीचा संकल्प पूर्ण झाला आहे.असे प्रतिपादन आ.मुनगंटीवार यांनी यावेळी केले.




*स्वच्छता,सृजन व आत्मनिर्भर भारतासाठी संकल्प करा....नरेंद्र मोदी.*


काशी विश्वनाथ मंदिराचे लोकार्पण झाल्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीचे महत्व समजावून सांगितले.विश्वनाथ धाम परीयोजना पूर्ण करण्यास 4 वर्षांचा अवधी लागला.हे मंदिर 3 हजार वर्ग मीटर मध्ये होते पण आता ते 5 लक्ष वर्ग मीटरचे झाले आहे.यासाठी 1000
कुटुंबाला परंपरागत निवास सोडावे लागले.त्या सर्वांचे मोदींनी आभार मानले.
याच वेळी त्यांनी समस्त जनतेला स्वच्छता,सृजन व आत्मनिर्भर भारत साठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले .स्वातंत्र्याचा अमृतकाळ आता आहे,जेव्हा या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा भारत आत्मनिर्भर असावा,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.यावेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वागतपर भाषणात,राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या काशी भेटीचा उल्लेख करून,काशी भव्य दिव्य व्हावी,अशी म.गांधींची पण इच्छा होती,याकडे सर्वांचे लक्ष वेधले


Millions of Shiva devotees visit Baba Vishwanath

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.