ब्रम्हपुरी (विनोद चौधरी ) :
राज्यात सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात मोकळेपणाने फिरणारा एकही जंगली हत्ती नाही. मात्र, आता छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातून गडचिरोली- चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात हत्तींचा एक कळप दाखल झाला आहे. त्यात लहान-मोठे मिळून १८ ते २३ हत्ती असल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.
ओडीसा राज्यातून छत्तीसगड मार्गे गडचिरोली जिल्ह्यात काही दिवसा अगोदर वन्य हत्तीच्या कळपाने प्रवेश केला होता. दोन-तीन दिवसा- आगोदर पंधरा ते विसच्या संख्येने असलेल्या हत्तीचा कळप देसाईगंज ( वडसा) तालुक्यातील उसेगाव कोंडाळा परिसरात आढळून आला.
हत्तींचा कळप लागूनच असलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा निश्चित करणाऱ्या वैनगंगा नदी पात्र करीत ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव खरकाडा निलज शेतशिवारात आज दि.8 डिसेंबर ला रात्रौ 8 ते 9 वाजताच्या सुमारास दाखल झाला असून, हत्तीला पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी तोबा गर्दी केली आहे.
सध्या जंगलात खाद्य वनस्पती आणि पाणी मुबलक प्रमाणात असेल तरी जंगलाच्या शेजारी शेती मध्ये धान पिक कापणीला आहे आणि हे हत्तीच आवडतं खाद्य आहे. त्यामुळे हे हत्ती शेतावर जाऊन धनाच नुकसान करू शकतात पण जर यांच्या जास्त जवळ गेल्यास हे हत्ती शेतकऱ्यांवर किंवा गावातल्या लोकांवर हल्ला करू शकतात उपवनसंरक्षक गडचिरोली यांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत सूचना केल्या आहेत तसंच आमचे क्षेत्रीय कार्यकारी गावातील लोकांना याबाबत दवंडी देऊन तसाच त्यांच्या सभा घेऊन हत्ती पासून सतर्क राहण्याच्या सूचना देत आहेत.
वन कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना पांगविण्यात येत आहे तर हत्तींच्या हालचालीकडे ब्रह्मपुरी वन विभागातील अधिकारी वन कर्मचारी ग्रस्त देत आहेत . पिंपळगाव खरकडा निलज परिसरात हत्तींचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे . नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.