Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, डिसेंबर १४, २०२१

वाडी केंद्रस्तरीय प्रश्न मंजुषामध्ये सागर पंत प्रथम | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम





वाडी, १४ डिसेंबर
केंद्र शासनाच्या आदेशानुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव इंडिया ७५ अंतर्गत वाडी केंद्रस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धा दवलामेटी येथील द्रुगधामना हायस्कूल आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात मंगळवार १४ डिसेंबर रोजी पार पडला. अध्यक्षस्थानी प्राचार्या सोमकुवर होत्या. प्रमुख पाहूणे म्हणून गट शिक्षणाधिकारी राजेशकुमार लोखंडे, जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी रामराव मडावी, शिक्षण विस्तार अधिकारी तथा वाडी केंद्राचे केंद्रप्रमुख शरद भांडारकर , अरूण कराळे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम महात्मा गांधी , सुभाषचंद्र बोस , क्रांतीज्योती सावीत्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हारार्पण करण्यात आले.प्रश्न मंजुषामध्ये वाडी केंद्रातील एकुण १२ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यापैकी उन्नती तेलमोरे, गुंजन खंडाळे, एंजल मेश्राम , सागर पंत , प्रेम सरोदे या पाच स्पर्धकाची निवड करण्यात आली. स्वातंत्र , समता, बंधुता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता यावर आधारीत पाच स्पर्धकांना प्रश्न विचारण्यात आले. त्यापैकी जि.प. हिन्दी माध्यम ( डिफेन्स ) दवलामेटी ( टोली ) शाळेचा सागर कृपानंद पंत प्रथम आला. हा विद्यार्थी तालुकास्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेसाठी पात्र ठरला. या विद्यार्थाला गट शिक्षणाधिकारी राजेशकुमार लोखंडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. प्रास्ताविक अरुण कराळे , संचालन प्रा. आरती भोरे , आभार प्रदर्शन प्रा. प्रगती पाचपोहर यांनी केले.स्पर्धेचे आयोजन शिक्षिका वैशाली लोही , गुणलेखन ज्योती अढावू , वंदना मुसळे , नोंदणी सुनीता चव्हाण यांनी केले. यावेळी प्रा. अविनाश चौधरी, प्रा.बाबूलाल मोरे , प्रा. गजानन काकड ,प्रा.विलास मोहोड , प्रा. अविनाश बारब्दे ,प्रा.जयश्री वाढई , प्रा. जयश्री किरणापूरे, अशोक राऊत, प्रकाश मस्के ,वंदना जांभुळकर , विलास चौधरी, लक्ष्मण शिंदे , नामदेव राऊत , राजू शेळके,शंकर राऊत , मंजु शिंदे , संजय नांगरे, रुपेश भोयर तसेच वाडी केंद्रातील शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.
फोटो

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.