भद्रावती येथील तहसील कार्यालयाचे तहसीलदार यांना दिनांक ११ डिसेंबरला सकाळी ११.३० वाजता २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली.
ही कारवाई नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तहसील कार्यालयात सापळा रचून केली.
डॉक्टर निलेश खटके तहसीलदार हे २५ हजारांची लाच घेताना तहसील कार्यालय भद्रावती येथे त्यांना अटक केली. फिर्यादीने विटाभट्टी च्या कारखान्या करिता मातीच्या लीज साठी तहसीलदार यांचेकडे रीतसर लेखी मागणी केली . या कामाकरीता तहसिलदार यांनी एक लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यातील रक्कम २५ हजार देण्याचे ठरले. याबाबतची तक्रार दिनांक १० डिसेंबरला नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली यावरून दिनांक ११ डिसेंबरला सकाळी ११.३० वाजता लाचलुचपत विभागाने तहसील कार्यालय येथे सापळा रचून फिर्यादी कडून तहसीलदार डॉ. खटके हे पंचवीस हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडून अटक केली. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक योगिता चापले, पोलीस हवालदार रविकांत डहाट , अनिल बहिरे ,निशा उमरेडकर , पोलीस शिपाई अमोल मेंगरे यांनी केली.