Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर १८, २०२१

श्री शिवछत्रपती महाविद्यालयात राज्यव्यापी मतदार नोंदणी शिबिर |

श्री शिवछत्रपती महाविद्यालयात राज्यव्यापी मतदार नोंदणी शिबिर

जुन्नर /वार्ताहर           

     जुन्नर येथील श्री शिवछत्रपती महाविद्यालयात राज्य व्यापी मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक यांनी सांगितले. 

     श्री शिवछत्रपती महाविद्यालय  जुन्नर व जुन्नर तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मतदार नोंदणी शिबिराचे विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी जुन्नर तालुक्याचे तहसीलदार  सबनीस  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक यांनी विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार यादी आपले नाव नोंदविणे आवश्यक असल्याचे सांगितले. भारताची लोकशाही बळकट करण्यासाठी युवा पिढीने पुढे येणे गरजेचे आहे असे सांगितले. मा.तहसीलदार सबनीस यांनी मतदानाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, पंचायत समिती, विधानसभा व लोकसभा इत्यादी ठिकाणी जनतेतून लोक प्रतिनिधी निवडले जातात. त्यांच्या हातून समाज विकासाचे कार्य घडत असते. लोकप्रतिनिधी निवडण्याचा सर्वस्वी अधिकार हा जनतेला आहे. तरुण पिढीने आपल्या हक्का बरोबरच कर्तव्याची देखील जाणीव ठेव्हावी. मतदानाचे महत्व विशद करताना त्यांनी जीवनातील अत्यंत महत्वाची उदाहरणे विद्यार्थ्यांना सांगितली. सायन्स विभाग प्रमुख डॉ. शेलार यांनी पाहुण्यांचे स्वागत व  प्राचार्य  मंडलिक यांनी  आभार मानले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.