Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर १८, २०२१

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याच्या कामाला सुरुवात

 

जुन्नर नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याच्या कामाला सुरुवात - नगराध्यक्ष शाम पांडे यांची माहिती

 


    जुन्नर नगरपरिषदेच्या वतीने दि. १८/११/२१ रोजी सकाळी ९:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या चबूतऱ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष शाम पांडे, उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी, समीर भगत, फिरोज पठाण, अविन फुलपगार, भाऊ कुंभार, अक्षय मांडवे, सुनिल ढोबळे, नरेंद्र तांबोळी, अलकाताई फुलपगार, अंकिता गोसावी, आश्विनी गवळी, सुवर्णा बनकर, कविता गुंजाळ, सना मन्सूरी, हजरा इनामदार, वैभव मलठणकर, चंद्रकांत डोके उपस्थित होते.

 

    सदरचा अश्वारुढ पुतळा हा पुणे येथील खेडकर स्टुडिओ मध्ये कलाकार निलेश खेडकर बनवित असून सदर पुतळ्याची किंमत २८ लक्ष रुपये आहे. व खालील चबुतरा बनविण्याचे काम हे सुमारे २५ लक्ष रुपये असून पुतळा व त्याभोवती सौंदर्यीकरण करण्याचे काम सुरू आहे. सदरहू पुतळ्यासाठी महाराष्ट्र शासन, मा. जिल्हाधिकारी पुणे, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, कलासंचालनालय महाराष्ट्र राज्य, मुख्य वास्तू विशारद महाराष्ट्र राज्य, गृहखाते, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे इत्यादी सर्व शासकीय परवानग्या मिळाल्याची माहिती नगराध्यक्ष शाम पांडे यांनी दिली. तसेच सदरहू पुतळ्याचे पावित्र्य जपण्याची, देखभाल - दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी जुन्नर नगरपालिकेची असल्याचे हमीपत्र मा. जिल्हाधिकारी यांना नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी जुन्नर नगरपरिषदेच्या वतीने सादर केले आहे. तसेच सद्यस्थितीमध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा पिंपळवंडी ग्रामपंचायतीला त्यांच्या आलेल्या मागणीनुसार विनामोबदला पुतळा देण्याचे सर्वानुमते ठरले असून तो पुतळा पिंपळवंडी ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्यात आला आहे. त्याची देखभाल - दुरुस्ती, शासकीय परवानग्या इ. संपूर्ण जबाबदारी त्यांची राहणार असल्याचे श्री. शाम पांडे यांनी सांगितले.

 

    सदरहू पुतळ्याच्या पायाभरणीसाठी शिवभक्त दीपेश परदेशी, संचित गुंजाळ, यांनी किल्ले रायगड,

शिवभक्त नरेंद्र तांबोळी, विशाल परदेशी, सलीम मुलाणी, ओंकार शिवले, यांनी सातारा येथून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजघराण्यातील देवांना शिवाई मातेची साडीचोळी अर्पण करून तेथुन पवित्र माती व जल तसेच छत्रपतींनी स्वराज्याची शपथ घेतली त्या रायरेश्वर मंदीरात समीर भगत, चंद्रकांत डोके, वैभव मलठणकर, विनायक गोसावी, अभिषेक शिंदे यांनी माती व जल तसेच अंकिता गोसावी, सुवर्णा बनकर, कविता गुंजाळ, रुपाली शहा, सीमा भगत, अमृता परदेशी, चारुशीला घायवट, सौरभ वरपे यांनी किल्ले शिवनेरी येथून माती व जल आणून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसविण्यासाठी आणलेल्या सर्व ठिकाणच्या पवित्र माती व जलाचे पायाभरणी करणेकरिता पुजा करून सदरहू माती व जल चबूतऱ्याच्या ठिकाणी अर्पण करण्यात आले. सदरहू काम हे ठेकेदार राजु सापळे, मुकेश ताजणे करत असून त्यांना चांगले काम करण्याबाबतच्या सूचना नगराध्यक्ष शाम पांडे यांनी दिल्या. एकुणच सर्व कार्यक्रम मंगलमय वातावरणात संपन्न झाल्याचे नगराध्यक्ष शाम पांडे यांनी सांगितले.


#Chhatrapatishivajimaharaj


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.