Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, नोव्हेंबर १३, २०२१

चकमकीत मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची माहिती | गडचिरोलीत २६ नक्षलवादी ठार

गडचिरोलीत २६ नक्षलवादी ठार 


 #naxal #Gadchiroli

गडचिरोली : जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात  पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मरभीनटोला गावानजीक कोटगुलच्या जंगलात झालेल्या चकमकीत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी ठार केले.  मिलिंद तेलतुंबडे उर्फ सह्याद्री चकमकीत ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची पोलिसांकडून अधिकृत पुष्टी झाली नाही. यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावाचा रहिवासी असलेला मिलिंद तेलतुंबडे भीमा कोरेगाव प्रकरणात अटक करण्यात आलेले  प्रा. आनंद तेलतुंबडे यांचा भाऊ असून त्याच्यावर देखील या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. याशिवाय जांभुळखेडा स्फोटात देखील त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. मिलिंद हा दीपक आणि सह्याद्री अशा विविध नावानी चळवळीत वावरतो. सोबतच दंडकारण्य केंद्रीय समितीचा तो सदस्य असून त्याच्यावर एक कोटीच्यावर बक्षीस आहे.


 आजची कारवाई ही राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.


 गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील कोटगुल जंगल परिसरात आज शनिवारी सकाळी पोलिसांचे सी-६० पथक शोध अभियान राबवत होते. यावेळी लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक सी-६० पथकावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत गोळीबार केला. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चकमकी  दरम्यान गडचिरोली पोलिसांचे तीन जवान देखील यामध्ये जखमी झाले असून त्यांना घटनास्थळावरून हेलिकॉप्टरने तात्काळ नागपूरला  हलवण्यात आले आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी याबाबत माहिती दिली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री

@Dwalsepatil यांनी प्रशंसा केली ."आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे," अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले


In an intense gunfight that broke out in the morning in Maharashtra’s Gadchiroli, at least 26 Naxals have been killed and 3-4 jawans have sustained injuries, police sources said. Notorious and dreaded Naxal operative, Milind Teltumbde, who is also an accused in the Bhima Koregaon violence case, has been killed in the encounter, sources said. He was a wanted accused by the NIA and the Pune police in the Elgar Parishad-Koregaon Bhima caste riots case.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.