नागपूर दि. 10 : नागपूरच्या प्रस्तावित हिवाळी अधिवेशनासाठी तात्पुरत्या स्वरुपात करण्यात येणा-या भरती प्रक्रीयेत इच्छूकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सन 2021 च्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या आगामी तृतीय ( हिवाळी ) अधिवेशन मंगळवार दिनांक 7 डिसेंबर 2021 रोजीपासून विधान भवन नागपूर येथे सुरु होणार आहे. अधिवेशन कालावधीकरिता सचिवालयात लिपीक टंकलेखक व शिपाई/ संदेशवाहक निव्वळ तात्पुरत्या स्वरुपातील पदे भरण्याकरिता उमेदवारांची आवश्यकता आहे. करिता उपरोक्त पदासाठी पात्र इच्छूक उमेदवारांना आवाहन करण्यात येते की त्यांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर या कार्यालयाच्या 0712 –2531213 या दुरध्वनी क्रमांकावर श्रीमती ज्योती वासुरकर ,कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.
अथवा लिपिक-टंकलेखक पदासाठी पात्र इच्छूक उमेदवारांनी परस्पर टंकलेखन चाचणी परिक्षेसाठी शनिवार दिनांक 27 नोव्हेबर 2021 रोजी सकाळी 11 - 30 वाजता विधान भवन नागपूर येथिल कक्ष- 1 (आस्थापना ) कक्षास उपस्थित राहावे. लिपिक –टंकलेखक पदासाठी शैक्षणिक पात्रता 12 वी, पदविधर/पदव्युतर इंग्रजी टंकलेखन 40 डब्लूपीएम मराठी टंकलेखन 30 डब्लूपीएम मराठी टंकलेखन 30 डब्लूपीएम शिपाई/ संदेशवाहक पदासाठी पात्र इच्छूक उमेदवारांनी परस्पर शुक्रवार दिनांक 26 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11. 30 वाजता विधान भवन नागपूर येथील कक्ष-१ (आस्थापना ) कक्षास उपस्थीत राहावे. शिपाई/संदेशवाहक पदासाठी शैक्षणीक पात्रता कमीत कमी 4 था वर्ग पास सर्व पदांसाठी मुलाखतीच्या दिनांकापर्यत वर्य अमागास उमेदवारांकरिता 38 वर्ष मागासवर्ग उमेदवाराकरिता 43 वर्ष सदर पदे तात्पुरत्या स्वरुपातील असून अधिवेशन कालावधीपूर्ती मर्यादित आहेत. अधिवेशनानंतर सर्व उमेदवारांची सेवा तात्काळ प्रभावाने संपुष्टात येईल. सद्यस्थितीत संपूर्ण देशात कोविड-19 विषानुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सदर मुलाखतीकरिता येणा-या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्राासह त्यांच्या स्वत:चा नजिकच्या कालावधीतील (72 तासापूर्विचा) कोरोना चाचणी अहवाल तसेच मास्क सोबत ठेवून स्वखर्चाने उपस्थित राहावे. त्याकरिता कोणताही भत्ता मिळणार नाही याची नोंद घ्यावी.
तरी सर्व पात्र इच्छूक उमेदवारांनी संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन, केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्र. ग्र. हरडे यांनी केले आहे.