Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, नोव्हेंबर १४, २०२१

कोरोना लस घेतली नसल्यास दुकानांवर लागणार स्टिकर्स |

 कोरोना लस घेतली नसल्यास दुकानांवर लागणार स्टिकर्स


कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी मनपाचे कठोर पाऊल

चंद्रपूर, ता. १४ : कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रतिबंधात्मक लस हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे १०० टक्के लसीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शहरातील विविध भागातील  दुकानदार आणि तिथे काम करणार्‍या कामगारांनी लस घेतली नसल्यास संबंधित दुकानांच्या दर्शनी भागात "स्टिकर्स" चिपकविण्यात येणार आहे.

#Chandrapur #Municipal #Corporation #Stickers #corona #vaccine 


कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नागरिकांच्या व्यापक आरोग्य हितासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने कठोर पाऊल उचलले आहे. फेरीवाले, सेवापुरवठादार यांनी लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र दाखवावे, अन्यथा बाजारात प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औद्योगिक वसाहती, उद्योग समूह, खासगी कार्यालय या ठिकाणचे कर्मचारी, कामगारांनी किमान पहिला डोस घेतल्याचा पुरावा दाखविणे बंधनकारक असून, वेगवेगळ्या उद्योग समूहात काम करणाऱ्या कामगारांना कामावर घेताना, मजुरांना काम देताना प्रत्येकाचे दोन डोस झाले आहे, याची खातरजमा करणे गरजेचे आहे. जनतेशी सतत संपर्क येणाऱ्या प्रत्येक सेवापुरवठादार, फेरीवाले, भाजीविक्रेते यांनी लसीकरण करणे बंधनकारक असून, मनपाची चमू गोल बाजार, गंज मार्केट आणि भाजी विक्रीच्या ठिकाणी लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र तपासणी करणार आहे. त्यामुळे सर्वानी तात्काळ लस घ्यावी, शिवाय प्रमाणपत्र सोबत ठेवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. 



जे दुकानदार आणि कामगार लस घेतलेली नाही, असे तपासणीत आढळून आल्यास त्या दुकानावर स्टिकर्स लावण्यात येणार आहे. "या दुकानात काम करणाऱ्या लोकांनी अजूनही कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस घेतलेली नाही. ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व आपल्या जबाबदारीवर प्रवेश करावा", असे या स्टिकर्सच्या माध्यमातून सूचित करण्यात येणार आहे.

सदर स्टीकर शासनाची मालमत्ता आहे. मनपातील अधिकृत व्यक्तीच्या परवानगीशिवाय हे स्टीकर काढू नये. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही निर्देश आयुक्त राजेश मोहिते यांनी दिले आहेत. 
आरोग्य विभागाने शहरात २१ केंद्रांवर लसीकरणाची सोय उपलब्ध केली आहे. त्यामुळे सर्व पात्र व्यक्तींनी तातडीने लस घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
--------------------------------

कोरोना का टीका नहीं लगने पर दुकानों पर लगेंगे स्टीकर

कोरोना से लड़ने के लिए निगम का कड़ा कदम

चंद्रपुर, ता. 14: कोरोना को खत्म करने के लिए प्रिवेंटिव वैक्सीन ही एकमात्र विकल्प है। इसलिए शत-प्रतिशत टीकाकरण का प्रयास किया जा रहा है। इसके लिए यदि शहर के अलग-अलग हिस्सों में काम करने वाले दुकानदारों और कामगारों का टीकाकरण नहीं कराया गया है तो संबंधित दुकानों के दृश्य क्षेत्रों में स्टिकर चिपका दिए जाएंगे.

चंद्रपुर नगर निगम ने नागरिकों के व्यापक स्वास्थ्य हित में कोरोना के खिलाफ लड़ाई में कड़े कदम उठाए हैं। फेरीवालों, सेवा प्रदाताओं को टीकाकरण का प्रमाण पत्र दिखाना चाहिए, अन्यथा बाजार में प्रवेश नहीं करने का निर्णय लिया गया है। औद्योगिक सम्पदाओं, उद्योग समूहों, निजी कार्यालयों के कर्मचारियों को यह प्रमाण देना आवश्यक है कि श्रमिकों ने कम से कम पहली खुराक ली है। जनता के लगातार संपर्क में रहने वाले प्रत्येक सेवा प्रदाता, पेडलर, सब्जी विक्रेता को टीका लगवाना अनिवार्य है। इसलिए निर्देश दिया गया है कि सभी को तुरंत टीका लगवाएं और प्रमाण पत्र भी अपने पास रखें.

यदि दुकानदारों और श्रमिकों का टीकाकरण नहीं हुआ पाया जाता है, तो दुकान पर स्टिकर लगाए जाएंगे। , "इस दुकान में काम करने वाले लोगों को अभी तक कोविड -19 निवारक टीका नहीं मिला है। उपभोक्ताओं को इस पर ध्यान देना चाहिए और अपने जोखिम पर प्रवेश करना चाहिए। यह स्टीकर सरकार की संपत्ति है। इस स्टिकर को किसी अधिकृत व्यक्ति की अनुमति के बिना नहीं हटाया जाना चाहिए। अन्यथा दंडात्मक कार्रवाई की जाएगी। स्वास्थ्य विभाग ने शहर के 21 केंद्रों पर टीकाकरण की सुविधा उपलब्ध करायी है. इसलिए प्रशासन ने सभी पात्र व्यक्तियों से तत्काल टीकाकरण कराने की अपील आयुक्त राजेश मोहिते ने की है.
----------
Stickers will be put on shops if corona vaccine is not given

Corporation's tough step to fight Corona

Chandrapur, Date14 : Preventive vaccine is the only option to eliminate corona. Therefore, 100% vaccination is being attempted. For this, if the shopkeepers and workers working in different parts of the city have not been vaccinated, then stickers will be pasted in the visible areas of the respective shops.

Chandrapur Municipal Corporation has taken strong steps in the fight against Corona in the larger interest of the citizens. The hawkers, service providers must show the certificate of vaccination, otherwise it has been decided not to enter the market. Employees of industrial estates, industry clusters, private offices are required to provide proof that the workers have taken at least the first dose. It is mandatory for every service provider, peddler, vegetable seller, who is in constant contact with the public, to get vaccinated. Therefore, it has been instructed that everyone should get vaccinated immediately and also keep the certificate with them.

If shopkeepers and workers are found not to have been vaccinated, stickers will be put up at the shop. , "The people working in this shop have not yet received the COVID-19 preventive vaccine. Consumers should pay attention to this and enter at their own risk. This sticker is the property of the government. Should not be removed without permission. Otherwise penal action will be taken. Health department has provided vaccination facility at 21 centers in the city. Therefore, the administration has appealed to all eligible persons to get vaccinated immediately, Commissioner Rajesh Mohite.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.