नरभक्षक वाघाच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची चोवीस तास गस्त
पोंभूर्णा:- पोंभूर्णा वनपरीक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या शेतशिवारात वाघाच्या हल्ल्याचे एकामागे एक झालेल्या घटनांमुळे परिसरात खळबळ माजली आहे. सलग तीन दिवसात तीन घटना घडले असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.तर या चालू वर्षात वाघाने दोघांचा बळी घेतला आहे. सदर घटनांमुळे सतर्कता ठेवत पोंभूर्णा वनविभागाची टिम ॲक्शनमोडवर असून वाघाचे बंदोबस्त करण्यासाठी चोवीस तास गस्त, व ट्रप कॅमेरे लावून उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच जंगलाच्या कडेलगत असलेल्या गावात दवंडी देऊन नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जात आहे.
वाघाच्या हल्ल्याच्या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. सध्या या भागात कापूस वेचणी व धान चुरण्याचे हंगाम सुरू आहे. मात्र वाघाच्या भितीने शेतकरी शेतमजूर कोणीही जंगलव्याप्त परिसराकडे भिरकतांना दिसत नाहीये. वाघाच्या वावरामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिगडत आहे. कापसाचे उभे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यावर ठोस उपाययोजना करण्यात याव्यात तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
-पोंभुर्णा तालुक्यात वाघाच्या हल्याच्या अनेक घटना घडल्या आहे.त्यात निरपराध लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या चालू वर्षात वाघाने दोघांचा बळी घेतला आहे. नरभक्षक वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
-वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी
वाघाच्या वावर क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी ११ ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले असुन वाघाच्या बंदोबस्तासाठी ४६ वन अधिकारी व कर्मचारी २४ तास गस्त घालत आहेत. पोंभूर्णा वनविभागाने वाघाच्या बंदोबस्तासाठी कंबर कसली असून वनविभाग ॲक्शन मोडवर आहे. वाघाचे पगमाॅर्क शोधले जात आहेत तर ट्रप कॅमेरेतून वाघाचे वास्तव्याची माहिती तपासली जात आहेत.
जंगलानजीक असलेल्या शेतात कापूस उभे आहे.कापूस वेचणीचे काम करण्यासाठी कुणीही शेताकडे जात नसल्याने वनविभाग अश्या संवेदनशील भागात वनकर्मचारी पाहारा देणार असल्याची माहिती आहे. यामुळे शेतकरी कापूस वेचणीचे व धान चुरण्याचे काम करू शकतील.