Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑक्टोबर २१, २०२१

टाटा मोटर्स ट्रकच्‍या डिलिव्‍हरीच्‍या स्‍मरणार्थ २३ ऑक्‍टोबर हा दिवस राष्‍ट्रीय ग्राहक सेवा दिन Tata Motors launches its annual customer-engagement program

टाटा मोटर्स कडून भारतभरातील ग्राहकांसाठी त्‍यांचा वार्षिक ग्राहक-सहभाग उपक्रम 'ग्राहक संवाद' लाँच


मुंबई, २१ ऑक्‍टोबर २०२१: टाटा मोटर्स ही भारताची सर्वात मोठी व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनी १९५४ मध्‍ये पहिल्‍यांदा टाटा मोटर्स जमेशदपूर प्‍लाण्‍टमधून लाँच करण्‍यात आलेल्‍या पहिल्‍या ट्रकच्‍या स्‍मरणार्थ २३ ऑक्‍टोबर हा दिवस 'राष्‍ट्रीय ग्राहक सेवा दिन' म्‍हणून साजरा करणार आहे. कंपनी २० ते २८ ऑक्‍टोबर २०२१ दरम्‍यान त्‍यांचा वार्षिक ग्राहक-सहभाग उपक्रम 'ग्राहक संवाद' देखील राबवणार आहे. या उपक्रमाचा ग्राहकांना कंपनीच्या नवोन्‍मेष्‍कारी सेवा आणि उत्‍पादन ऑफरिंग्‍जबाबत माहिती देण्‍याचा मनसुबा आहे. टाटा मोटर्समधील कार्यकारी ग्राहकांसोबत संवाद साधतील आणि अभिप्राय जाणून घेत त्‍यांच्‍या अपेक्षा, प्रमुख मुद्दे व सूचना समजून घेतील. ज्‍यामुळे त्रासमुक्‍त ड्रायव्हिंग अनुभवासाठी कंपनीच्‍या विक्री-पश्‍चात्त सेवा सानुकूल करण्‍यासोबत उत्‍पादन ऑफरिंग्‍जमध्‍ये सुधारणा करता येतील.

या अद्वितीय उपक्रमाबाबत बोलताना टाटा मोटर्सच्‍या कमर्शियल वेईकल बिझनेस युनिटच्‍या कस्‍टमर केअरचे जागतिक प्रमुख श्री. आर. रामाकृष्‍णन म्‍हणाले, ''ग्राहक संवाद टाटा मोटर्सच्‍या व्‍यावसायिक वाहनांचा अवलंब करणा-या ग्राहकांसाठी प्रमुख उत्‍प्रेरक आहे. सर्वोत्तम विक्रीपश्‍चात्त सेवा वाहनाच्‍या संपूर्ण जीवनचक्रादरम्‍यान अधिकतम अपटाइम आणि कमी टोटल कॉस्‍ट ऑफ ऑपरेशन्‍स (टीसीओ) यांची खात्री देते. दरवर्षी राष्‍ट्रीय ग्राहक सेवा दिन आम्‍हाला आमची विक्रीपश्‍चात्त सेवा आणि ग्राहक संबंधाच्‍या दर्जामध्‍ये सुधारणा करण्‍यामध्‍ये मदत करतो. आम्‍ही आमचे सहयोगी व ग्राहकांकडून मिळालेल्‍या सूचना, मते व बाजारपेठ माहितीसाठी खूपच उत्‍सुक असतो. तसेच आम्‍ही या अभिप्रायांची आमचे उत्‍पादने व सेवांच्‍या विकासामध्‍ये अंमलबजावणी करतो.''

टाटा मोटर्स व्‍यावसायिक वाहन बाजारपेठेत अग्रस्‍थानी आहे आणि त्‍यांच्‍या वाहनांची श्रेणी भारतीय लॉजिस्टिक्‍स उद्योगक्षेत्रामध्‍ये सर्वाधिक पसंतीची आहे. संपूर्ण सेवा २.०च्‍या माध्‍यमातून टाटा मोटर्स दर्जात्‍मक व्‍यावसायिक वाहन मूल्‍यवर्धित सेवा देते, ज्‍यामधून ग्राहकांना संपूर्ण समाधान मिळते. संपूर्ण सेवा २.० पॅकेजमध्‍ये ब्रेकडाऊन असिस्‍टण्‍स, गॅरेण्‍टीड टर्नअराऊंड टाइम, अॅन्‍युअल मेन्‍टेनन्‍स कॉन्‍ट्रॅक्‍ट्स (एएमसी) आणि जेन्‍यूअन स्‍पेअर पार्टसच्‍या सुलभ उपलब्‍धतेसोबत उद्योगक्षेत्रातील इतर दर्जात्‍मक मूल्‍यवर्धित सेवा जसे अपटाइम गॅरंटी, ऑनसाइट सर्विस आणि फ्यूएल इफिशिएन्‍सी मॅनेजमेंट प्रोग्राम यांचा समावेश आहे. टाटा मोटर्स अपटाइम वाढवण्‍यासाठी आणि एमअॅण्‍डएचसीव्‍ही व निवड आयअॅण्‍डएलसीव्‍हीच्‍या संपूर्ण श्रेणीसह मालकीहक्‍काचा एकूण खर्च कमी करण्‍यासाठी टाटा मोटर्सचे सानुकूल फ्लीट मॅनेजमेंटकरिता असलेले नेक्‍स्‍ट-जनरेशन डिजिटल सोल्‍यूशन – फ्लीट एजचे स्‍टॅण्‍डर्ड फिटमेंट देखील देते.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.