Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑक्टोबर ०८, २०२१

स्थायी समिती सभापतीपदासाठी संदीप आवारी यांच्या नावाची चर्चा

११ ऑक्टोबरला होणार निवडणूक
चंद्रपूर, ता. ८ : चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक ११ ऑक्टोबारला होणार आहे. त्यासाठी ९ ते ११ ऑक्टोबरदरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. स्थायी समिती सभापतीपदासाठी संदीप आवारी (Sandeep Awari ) यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २१(१) (५) तरतुदी अन्वये स्थायी समितीच्या सदस्यांतून सभापती यांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी विभागीय आयुक्त नागपूर विभाग नागपूर यांच्याकडील पत्रानुसार स्थायी समितीची विशेष बैठक पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता चंद्रपूरशहर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत दुसरा माळा, राणी हिराई सभागृहात होत आहे. सभापती निवडणुकीसाठी ९ ते ११ ऑक्टोबरदरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ९ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत नगरसचिव यांच्या कार्यालयात कोरे नामनिर्देशन पत्राची उचल करता येईल. १० रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करणे, ११ रोजी सभा सुरु झाल्यावर नामनिर्देशन पत्राची छाननी होईल. त्यानंतर १५ मिनिटाच्या कालावधीत नामनिर्देशन पत्र मागे घेता येईल. त्यानंतर आवश्यकतेनुसार मतदान होईल.
Sandip Awari standing committee chairman
SANDIP AWARI
MUL ROAD  SARKAR NAGAR. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.