*मोदी सरकार हे मृत शेतकऱ्यांप्रती संवेदनहीन : आमदार प्रतिभाताई धानोरकर
चंद्रपूर : उत्तरप्रदेशात शेतकऱ्यांप्रती झालेल्या हिसाचार हि केंद्र आणि उत्तरप्रदेश राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकारची चौकशी व्हायला हवी. तसेच सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाच्या देखरेखीखाली हि चौकशी करावी तसेच मृत शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त कारण्यासचीही केंद्र सरकारची मानसिकता नाही, मोदी सरकार हे संवेदनहीन आहे, अशी टीका आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली. त्या आज वरोरा येथे बंद करण्यात आला. व्यापाऱ्यांनी देखील बंद ला उत्तम प्रतिसाद दिला.
यावेळी माजी विधानसभा उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, विलास नेरकर, विलास टिपले, मिलिंद भोयर, राजु चिकटे, गजानन मेश्राम, राजु महाजन, रवींद्र धोपटे, मनोहर स्वामी, सानी गुप्ता, शशी चौधरी, प्रदीप बुरान, विशाल पारखी, जयंत टेमुर्डे, निलेश भालेराव,बंडुजी डाखरे, संदीप मेश्राम, छोटुभाई शेख, शुभम चिमुरकर, बंडु भोंगळे, यशोदा खामणकर, प्रतिमा जोगी, लता हिवरकर यांची उपस्थिती होती.
लखीमपूर येथील शेतकऱ्यांबाबत घडलेल्या निर्दयी घटनेचा सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या कि, लखीमपूर खिरी घटनेवरून भाजप सरकार शेतकरी विरोधी असल्याचे दिसून येते. संविधानामुळे बहुमताने सत्तेत आलेले सरकार घटनाच गुंडाळून ठेवत आहेत. नव्या कृषी धोरणामुळे सातबारावरून शेतकऱ्यांची नवे कमी होऊन कुळ म्हणून अंबानी, अदानी यांची नवे लागणार आहेत. त्यांच्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या कि, शेतकऱ्याला काहीच मिळणार नाही. बाजार समीरचे अस्तित्व संपणार आहे. म्हणून शेतकऱ्यांचा या कृषी धोरणाला विरोध आहे. देशात लोकशाही आहे कि नाही अशी सद्या परिस्थिती आहे. भावनिक विषयावर भाजप राजकारण करत आहे. त्यामुळे समाजातील कोणताही घटक आज सुरक्षित नाही असे अशी टीका त्यांनी केली.
*मंत्र्यांनी राजीनामा द्यावा : आमदार प्रतिभाताई धानोरकर
लखीमपूर खिरीमध्ये अतिशय क्रूर, निर्दयीपणे शेतकऱ्याचा बाली घेण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित मंत्र्यांनी नैतिकतेने राजीनामा देणे आवश्यक होते. यातील आरोपीना पाठीशी घालण्याचे काम हे सरकार करीत आहे. हे सांगण्यासाठी व आरोपीना कठोर शिक्षा करण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली आहे.