Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑक्टोबर ०१, २०२१

वाढत्या महागाईच्या विरोधात नागपूर मनसे प्रणित वाहतूक सेनेचा मोर्चा


वाढत्या महागाईच्या विरोधात नागपूर मनसे प्रणित वाहतूक सेनेचा मोर्चा
महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर तर्फे आज पेट्रोल डिझेल व इतर जीवनावश्यक वस्तू दरवाढीच्या विरोधात संविधान चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर असा निषेध मोर्चा काढण्यात आला. सकाळी दहा वाजता संविधान चौक येथे मनसे पदाधिकारी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात केली.

 " पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द करा"
"केंद्र सरकारचा निषेध असो" "राज्य सरकारचा निषेध असो" "घरगुती गॅसच्या किंमती कमी करा" "जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करा" अश्या विविध घोषणा देत मोर्च्यात सामील मनसैनिक , वाहतूकदार यांनी आपल्या दुचाकी, तीन चाकी गाड्यांना धक्का देत मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालय कडे वळविला पण पोलिस प्रशासनाने मोर्चाची परवानगी नाकारत आकाशवाणी चौकाच्या अगोदर मनसेचा निषेध मोर्चा अडविला. यावेळी मनसे पदाधिकारी आणि पोलिस अधिकारी यांच्यात बातचीत होऊन मनसेचे शिष्टमंडळ प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वात पोलिस वाहनाद्वारे विभागीय आयुक्त सौ. प्राजक्ता लवंगारे - वर्मा  यांच्या भेटीस गेले व त्यांना सतत वाढत असलेला महागाईचा भस्मासुर केंद्र व राज्य सरकारने रोखण्याबाबत निवेदन सादर केले. मनसेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की,केंद्र सरकार असो वा राज्य सरकार सातत्याने वाढत असलेल्या महागाईला आळा घालण्यास पूर्णतः अयशस्वी ठरत आहे. सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढलेले दिसत आहे. पेट्रोल, डिझेल इंधनाचे दर शंभरी पार करून रुपये दीडशेच्या वाटेवर आहे. खाद्यतेलांचे भाव दुप्पट झालेत. घरगुती सिलेंडरचा भाव  विक्रमी उच्चांक रुपये एक हजार पार करीत आहे. सरकारने याची त्वरित दखल घ्यावी.  विभागीय आयुक्त यांनी चर्चे वेळी सकारात्मक प्रतिसाद देऊन आपले म्हणणे सरकार कडे ताबडतोब पाठवू असे आश्वासन मनसे शिष्टमंडळाला दिले. 
मनसेचे शिष्टमंडळ परत येईपर्यंत पोलिसांनी अडविलेल्या ठिकाणी रस्त्यावर ठिय्या देऊन बसलेले मनसैनिक नारे निदर्शने करीत राहिले*
. यानंतर मनसे प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, दुर्दैवाने दोन वर्षापासून कोरोनामुळे संपूर्ण जीवन अस्ताव्यस्त झाले आहे, अनेक कुटुंबांनी आधारकर्ते गमाविले, लाखो तरुण महिला भगिनी यांना या संकट समयी आपली नोकरी गमवावी लागली, व्यावसायिकांना प्रचंड नुकसान झाले आहे, तरी हे निष्ठुर केंद्र व राज्य सरकार जे खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आली आहेत,त्यांना महागाईने होरपळून गेलेल्या जनतेचा विसर पडला आहे यांना आता येणाऱ्या निवडणुकात समस्त जनता सत्तेवरून खाली खेचून त्यांची जागा निश्चित दाखवेल असे प्रतिपादन केले.  नियोजित निषेध मोर्चा स्थळी संबोधित करताना प्रास्ताविक शहर अध्यक्ष अजय ढोके यांनी केले .
 वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक सचिन धोटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, दैनंदिन रोजंदारीवर काम करणारे वाहतूकदार तर अक्षरशः संकटात सापडले आहेत. बँकेचे कर्ज घेऊन वाहतूकदार आपले वाहन चालवून कसे तरी पोट भरत होते पण या कोरोनाच्या कठीण काळात सुध्दा सरकारने यांना वाहनांची बँक किस्त भरण्याबाबत कुठलाही दिलासा दिला नाही. खाजगी असो वा सरकारी बँक यांचे वसुलीपथक दार महिन्याला या वाहतूकदारांच्या घरी धडकते, दबाव टाकते, वाहने जप्त केली जातात. फक्त सरकारी आणि बँकेचे नियम पुढे करून सामान्य ऑटो चालक , टेम्पो चालक व इतर वाहतूकदार यांना वेठीस धरले जाते या निकामी सरकारचा निषेध करा असे म्हटले. मोर्चाची सांगता प्रसंगी शहर अध्यक्ष विशाल बडगे यांनी आभार प्रदर्शन केले. 
याप्रसंगी मनसे प्रदेश सरचिटणीस  हेमंत गडकरी, मनसे शहर अध्यक्ष अजय ढोके व विशाल बडगे, जिल्हा अध्यक्ष सतीश कोल्हे व किशोर सरायकर, उप शहर अध्यक्ष प्रशांत निकम, वाहतूक जिल्हा संघटक सचिन धोटे, शहर सचिव शाम पूनियानी व घनश्याम निखाडे, महिला सेना जिल्हा अध्यक्षा श्रीमती अचला मेसन व कल्पना चौहान, महिला शहर अध्यक्षा संगीता सोनटक्के व मनीषा पापडकर, मनविसेचे आदित्य दुरुगकर व दुर्गेश साकुलकर  मनोज गुप्ता, उत्तर विभाग अध्यक्ष उमेश बोरकर, मध्य विभाग अध्यक्ष शशांक गिरडे, दक्षिण पश्चिम विभाग अध्यक्ष तुषार गिऱ्हे, पूर्व विभाग अध्यक्ष उमेश उत्तखेडे, दक्षिण विभाग अध्यक्ष पिंटू बिसेन, नागपूर ग्रामीणचे जिल्हा उपाध्यक्ष नरेश भोयर, अनिल पारखी, दीपक ठाकरे, दीपक नासरे, सचिन टीचकुले,  वाहतूक सेनेचे शहर संघटक मंगेश शिंदे, गजानन टिपले, अभय व्यवहारे, अमर भारद्वाज, विभाग सचिव महेश माने, सुजित मधुमटके, महिला विभाग अध्यक्षा रचना गजभिये, मंजुषा पाणबुडे, सुनिता कैथैल , मनीषा पराड, शाखा अध्यक्षा वैशाली फुलझेले व अनु सहारे, गणेश मुद लियार, वैभव पराते,अजय सिरसवार,  नरेंद्र पाटील, अभिषेक डे , नितीन वाकोडे,समीर अरबट, सत्यजीत उईके, अजय मारोडे,  इत्यादी मनसे पदाधिकारी व वाहतूकदार उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.