धम्माचा सहवास मानवी जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवितो - धम्ममित्र भिमराव उंदीरवाडे
65 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन परिसरात उत्साहात साजरा
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध ता.15 ऑक्टोबर:-
अस्पृश्यतेच्या कचाट्यातून मानवाला मुक्त करण्यासाठी, बाबासाहेबांनी धम्मक्रांती केली.माणूस म्हणून आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी हे धर्मपरिवर्तन होते. इतर धर्माच्या संस्थापकांनी स्वतःला ईश्वरी अंश संबोधले. परंतु बुद्धांनी मात्र मी मार्गदाता आहे असे सांगून, दुसरा बुद्ध होऊ शकतो, ही संधी अखिल मानवजातीला बहाल केली. नवसमाज निर्मितीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, जातीभेदाला नाकारण्यासाठी,सुंदर सुखी जीवनाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाबासाहेबांनी बौद्ध धम्म दिला. धम्माचा सहवास मानवी जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवितो. असे प्रतिपादन धम्ममित्र भिमराव उंदीरवाडे यांनी केले.येथील नगर बौद्ध समाजाच्या वतीने ६५ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रशिक बुद्ध विहार येथे आयोजित धम्मध्वजारोहण कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते.आज दि. १५ ऑक्टोंबर रोजी ६५ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सकाळी ८.३० वाजता प्रशिक बुद्ध विहारात धम्ममित्र भिमराव उंदिरवाडे यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी सरपंच अनिरुद्ध शहारे, भास्कर बडोले ,भीमराव मोटघरे, समाजाचे अध्यक्ष रेवचंद शहारे,कोषाध्यक्ष देवदास बडोले,दुर्योधन राऊत,हेमचंद लाडे,सरगम सहारे,राजेंद्र साखरे,शीतल राऊत,भीमाबाई शहारे,सचिन सांगोळकर उपस्थित होते.सकाळी ९.०० वाजता पंचशील बुद्ध विहार इंदिरानगर येथे सकाळी दहा वाजता रवींद्र दहिवले यांच्या हस्ते, डी. डी. भालाधरे, श्रीचंद उंदीरवाडे कमल घरडे, नंदलाल उके, शेंडे, सुगंधा राऊत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला .तर जेतवन बुद्ध भूमी प्रकल्प येथे नगर बौद्ध समाजाचे अध्यक्ष रेवचंद शहारे यांच्या हस्ते धम्मक हजारों करण्यात आले. यावेळी प्रा.दिनेश जांभूळकर, नरेश बडोले, आनंद जनबंधू, ठाणेराव वैद्य, उपस्थित होते. सकाळी आठ वाजेपासूनच धम्म बांधवांनी विहारात येऊन बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्प वाहून अभिवादन केले. दुपारी 3.00 वाजता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम हरिश्चंद्र लाडे यांच्या अध्यक्षतेखाली वामन जांभूळकर, संजीव बडोले,हेमचंद लाडे, देवदास बडोले यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. सामान्य ज्ञान परीक्षेत प्रथम क्रमांक श्रेया शहारे द्वितीय क्रमांक सुमित बडोले, तृतीय क्रमांक शेजल शहारे यांनी पटकावले. तर गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक माधुरी गायकवाड,द्वितीय क्रमांक सेजल साखरे, तृतीय क्रमांक निधी शहारे यांनी पटकावले. विजेत्या स्पर्धकांना अतिथींच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. तर सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून भास्कर बडोले यांनी काम पाहिले. दुपारी 3.00 वाजता पंचशील भजन मंडळाचे गायनाचे आयोजन करण्यात आले होते. १३ ऑक्टोंबर ला धम्म प्रबोधनाचे आयोजन केले होते.दिनांक १४ ऑक्टोंबर रोज गुरुवारला इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांकरीता स्पर्धा परीक्षेचे व गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
होते.अशोक विजयादशमी निमित्त तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.