Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑक्टोबर ११, २०२१

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिर




चंद्रपूर : अखिल भारतीय श्री गुरुदेव महिला व पुरुष सेवा मंडळ , चंद्रपूर च्या वतीने वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हयांचे 53 वे पुण्यस्मरण व राष्ट्रसंतांचे आजिवन सेवक स्व . कृष्णराव हजारे यांच्या 17 व्या पुण्यस्मरणा निमित्य रक्तदान शिबीर , सामुदायीक ध्यान प्रार्थना व किर्तनाचा कार्यक्रम दि . 11 ऑक्टोंबर 2021 रोजी स्थानिक वं . राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भवन , नागपूर रोड , चंद्रपूर येथे आयोजित केला आहे . रक्तदान शिबीर सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून या रक्तदान शिबीरास अखिल भारतीय सेवा मंडळाचे सर्व उपासक , परिवार गण तथा मित्रमंडळी यांनी रक्तदान करून वंदनिय राष्ट्रसंतांना आदरांजली अर्पण करावी . सदर कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे सकाळी 7 वाजता घटस्थपना मुर्ती पुजन आणि सामुदायिक ध्यान , त्यानंतर सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत अखिल भारतीय श्री गुरूदेव महिला व पुरुष भजन मंडळ , चंद्रपूर शहर यांचा भजन कार्यक्रम , तसेच दुपारी 3 ते सांय 5 वाजेपर्यंत ह.भ.प. लक्ष्मणराव काळे महाराज यांचे प्रबोधनात्मक किर्तन व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना श्रध्दांजली व सामुदायीक प्रार्थना आणि राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता होणार आहे . सदर पुण्यस्मरण कार्यक्रमास चंद्रपूर जिल्हयातील सर्व गुरूदेव प्रेमिंनी उपस्थीत राहुन कार्यक्रमाची शोभा वाढविण्याचे आवाहन जिल्हा सेवाधिकारी अॅड . दत्ताभाऊ हजारे , अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ चंद्रपूर जिल्हा तथा महिला व पुरुष सेवा मंडळ , चंद्रपूर शहर आणि हजारे परिवार यांनी केले आहे .


Blood donation camp on the occasion of Rashtrasant Tukadoji Maharaj's death anniversary

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.