शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
:- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर, नेहरू युवा केंद्र चंद्रपूर, द असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल स्पोर्ट्स फॉर ऑल चंद्रपूरचे नेतृत्वात तथा भद्रावती नगर पालिकेच्या विद्यमाने दि.3 ऑक्टोबरला सकाळी 7 वाजता भद्रावतीच्या प्रमुख मार्गाने पैदलवारी नेवुन "विश्व पैदल दिवस -2021" ( वर्ल्ड वॉकिंग डे-2021) साजरा करण्यात आला.
बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार येथे भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. प्रतिभाताई धानोरकर यांच्या शुभहस्ते लाल फित कापून व हिरवी झेंडी दाखवून पैदल रॅलीची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष संतोष आमने,रेंशी दुर्गराज रामटेके, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर, नगरसेवक प्रफुल चटकी,योग प्रशिक्षक अनंता आखाडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते तथा विविध शाळांमधील विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते.
ही पैदल रॅली बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारापासून मार्गक्रमण करीत जुना बस स्टॉप,नागमंदिर ते विवेकानंद महाविद्यालय ते विंजासन बौद्ध लेणी येथे पोहचून विसर्जीत झाली.
प्रोफेशनल योगा एक्सपर्ट कोच श्री विकास सर यांनी सर्व उपस्थितांन्ना 30 मिनिट स्पेशल योगा ट्रेनिंग दिले.
यामध्ये अनंता मत्ते , सुरज गावंडे , उमेश रामटेके , राकेश शिंदे , प्रशांत झाडे , मनीष भागवत , संजय माटे , सेंसाई बंडू रामटेके , प्रोफेसर संगीता बाम्बोडे ,सौ किरण वानखेड़े , कपिल शेंडे , विक्रांत ढोके , उल्फतद्दीन सैयद , मिलिंद वाघमारे सर , अजय पाटिल सर , किशोर झाड़े यांच्या सह
भद्रनाग कराटे क्लब , गुरूदेव सेवा मंडळ,पतंजली योग समिती, इको-प्रो संस्था, पत्रकार असोसिएशन,नगर परिषद तथा शहरातील विविध सामाजिक संघटनांनी व एलन थिलक कराटे स्कूल च्या स्टूडेंट्स नि सहभाग घेतला होता.