नवेगावबांध दि.२१.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा नवेगावबांधचा विजयादशमी उत्सव दुर्गा माता मंदिर येथे डॉ.गजानन डोंगरवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.यावेळी नवेगाव बांध येथील उद्योगपती नितीन पुगलिया,प्रमुख वक्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भंडारा जिल्हा कार्यवाह उमेश मेंढे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात गुरुस्थानी असलेले भगवा ध्वज,भारत माता, डॉ.हेडगेवार,गोळवलकर गुरुजी यांचे प्रतिमापूज,शस्त्र पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली.डॉ.गजानन डोंगरवार यांनी भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.वर्षभर संपन्न होणाऱ्या सणातून जल,वायु, महिला,पुरुष,प्राणी सजीव-निर्जीव यांना पूजनाच्या भारतीय संस्कृतीतून माणुसकीचे दर्शन होते.भारतीय संस्कृती ही निसर्गपूजक आहे. विश्वात सर्व धर्मांमध्ये हिंदू धर्म सर्वश्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन केले.प्रमुख वक्ते उमेश मेंढे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांचे कार्य याविषयी मार्गदर्शन केले.शाखा ही संघाचा आत्मा आहे.शाखेतून प्रखर देशभक्त वादी स्वयंसेवक घडतात.हे स्वयंसेवक देशसेवेसाठी जीवनाचे समर्पण करतात. जगातील सर्वात मोठे संघटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. निस्वार्थपणे सेवा देण्याचे काम स्वयंसेवक करतात.देशावर कुठलीही राष्ट्रीय आपत्ती आली तर स्वयंसेवक जीवाची बाजी लावून काम करतो.भारत अनादीकाळापासून विश्वगुरू होता.मात्र परकीय आक्रमणामुळे आणि भारतातील फुटीरवादी संधिसाधू मुळे देश पारतंत्र्यात गेला.आज भारत पुन्हा विश्वगुरू होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे मत उमेश मेंढे यांनी व्यक्त केले. यावेळी तालुका कार्यवाह पंढरी काशिवार,अण्णाजी डोंगरवार, महादेव बोरकर,रघुनाथ लांजेवार,एकनाथ बोरकर, जितेंद्र कापगते,विठ्ठल जुगनाके,दिलीप पावडे, पुंडलिक बोरकर,बाळकृष्ण डोंगरवार, मुकेश वराडे,नामदेव पुस्तोडे,साधू ठाकरे उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन व आभार तोसित बोरकर यांनी केले.