Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑक्टोबर १८, २०२१

ख्रिश्चन बांधवानी राजकारणात सक्रिय व्हावे*


*ख्रिश्चन बांधवानी राजकारणात सक्रिय व्हावे* 

*ख्रिस्ती विकास समिती वणी येथे खासदार बाळू धानोरकर यांचे आवाहन* 

                      
वणी :  समाजातील महत्वाचा घटक ख्रिश्चन समाज आहे. त्याचा विकास करण्यासाठी, कुठलाही भेदभाव न करता, त्यांना सक्षम करण्यासाठी तसेच ख्रिश्चन समाजाला समृद्धीसाठी कटिबद्ध असून उच्च शिक्षण, आर्थिक विकास, राजकारणात सहभाग, सामाजिक सुरक्षा प्रदान, महिला स्वयंरोजगार, जिल्हास्तरीय वसतिगृह, तालुका स्तरावर कब्रस्थान हे प्रश्न मार्गी लावेल अशी ग्वाही खासदार बाळू धानोरकर यांनी दिली. या समाजातील समाजबांधवांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व करण्याचे आवाहन देखील खासदार बाळू धानोरकर यांनी केले. ते वणी येथे ख्रिस्ती विकास समिती कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते वणी तालुक्यातील पास्टर्स चा सत्कार करण्यात आला.  

यावेळी माजी आमदार वामनराव कासावार,  ख्रिस्ती विकास समितीचे अध्यक्ष तथा काँग्रेस प्रदेश कमिटी सचिव विजय नळे, आशिष कुलसंगे, राजीव रेड्डी, प्रमोद वासेकर, विवेक मांडवकर, वंदनाताई आवारी, संध्याताई बोबडे, सुनील वरारकर, डॉ. पावडे, विलास मांडवकर, प्रशांत साठे, विजय मेश्राम, अमित साहेजी, विद्याताई, पास्टर बेजामीन, संजय रामटेके यांची उपस्थिती होती. 

          पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, ख्रिश्चन समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. परंतु त्या प्रत्यक्षात योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे या समाजातील शेवटच्या घटक या योजनांपासून वंचित असल्याचे दिसून येते. त्यासोबतच  ख्रिश्चन समाजातील तरुणांना नोकरी व शिक्षणात आरक्षण मिळावे. सुशिक्षित बेरोजगारांच्या उद्योग विकासासाठी मदर तेरेसा यांचा नावार स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती करावी यासाठी मी नेहमी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. यावेळी अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली. यावेळी मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती समाजातील लोकांची उपस्थिती होती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.