Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, सप्टेंबर १०, २०२१

शाश्वत स्वच्छतेसाठी घोषवाक्य लेखन स्पर्धा |

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे - डॉ. मिताली सेठी


चंद्रपूर, (प्रतिनिधी) दिनांकः 10/09/2021 ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेची संस्कृती रुजावी आणि लोकसहभागातून शाश्वत स्वच्छता टिकून राहावी म्हणून राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी घोषवाक्य लेखण स्पर्धेत सहभागी व्हावे . असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मिताली सेठी यांनी केले .



केंद्र शासनाच्या हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) या संकल्पनेवर आधारित दिनांक 1 सप्टेंबर ते 15ऑक्टोबर 2021 या कालावधीमध्ये घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती / वाडी / वस्ती मध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये शौचालयाचा नियमित वापर, लहान बाळाच्या विष्ठेचे व्यवस्थापन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, गोबर्धन ओला, सुका व प्लास्टिक कचरा विलगीकरण अशा विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे.स्वच्छता विषयक संदेश असलेले घोषवाक्यांचे लेखन गावातील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बाजार पेठ, सरकारी दवाखाने, बस स्थानक, पोस्ट ऑफिस, सार्वजनिक जागा अशा विविध दर्शनी भागावर करावयाचे आहे.

Slogan writing competition for sustainable cleanliness

तालुकास्तरावर सदर स्पर्धेचे सनियंत्रण व गावातील घोषवाक्यांची तपासणी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी करणार आहेत. उत्कृष्ट घोषवाक्य लिहिणाऱ्या ग्रामपंचायतीचा गौरव दि. 2ऑक्टोबर 2021 रोजी जिल्हास्तरावर करण्यात येणार आहे, तर उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन जिल्ह्यांचा सन्मान राज्यस्तरावर होणार आहे. दरम्यान घोषवाक्य लेखन स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदवून आपले गाव स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मिताली सेठी यांनी केले .




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.