Rules -apply-for-Ganeshotsav-in-Nagpur
नागपूर : तुमच्या घरी गणपती विराजमान होत असतील तर हि बातमी तुमच्यासाठी आहे कोरोनाच्या संसर्ग वाढीला गणेशोत्सवामुळे होणारी गर्दी कारणीभूत ठरू नये. यासाठी गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा यासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातही मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यानुसार गणेशमूर्तीच्या उंचीवर मर्यादा घालण्यात आली असून सार्वजनिक मंडळाची ४ फूट, तर घरगुती गणपती २ फुटांपर्यंत ठेवता येईल.
अशा आहेत मार्गदर्शक सूचना
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांना महापालिका वा स्थानिक प्रशासनाची पूर्व-परवानगी घ्यावी लागेल. सुसंगत व मर्यादित मंडप उभारावे. सार्वजनिक मंडळाची सजावट साधी असावी. सार्वजनिक मंडळाची गणेशमूर्ती ४ फूट तर घरणुती गणपती २ फुटांचा असावा. शक्यतो घरातील धातू, संगमरवर या गणेशमूर्तीचे पूजन करावे. शाडूची किंवा पर्यावरणपूरक गणेशमूर्ती असल्यास घरी विसर्जन करावे.