Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, सप्टेंबर ०९, २०२१

विदर्भात २२ लाख ग्राहकांकडे ९२३ कोटींची थकबाकी



वीज बिलाची वसुली करा अन्यथा कारवाई

चंद्रपूर परिमंडळातील थकबाकीतील २,६०,७२३ ग्राहकांकडे - ६६ कोटी ९० लाख थकबाकी



विदर्भातील महावितरणच्या २२ लाख ग्राहकांकडे ९२३ कोटी रुपयांची थकबाकी आहे.अशा परिस्थितीत महावितरण कंपनी टिकवायची असेल तर वीज बिल वसुली शिवाय पर्याय नाही.त्यामुळे वीज बिल वसुलीत हयगय केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येइल,असा इशारा नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी दिला.

नागपूर प्रादेशिक विभाग अंतर्गत येणाऱ्या पाचही परिमंडळातील मुख्य अभियंते, अधीक्षक आणि कार्यकारी अभियंते यांची बैठक ८ सप्टेंबरला नागपूर येथे आयोजित करण्यात आली. या बैठकीत प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी सर्व परिमंडलांचा सविस्तर आढावा घेतला. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सर्वच वर्गवारीतील थकबाकी १०० टक्के वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नागपूर प्रादेशिक विभागातील कर्मचाऱ्यांनी थकबाकी वसुली आणि वीज हानी कमी करण्यासाठी नियोजनबद्धरित्या काम करावे.त्यासाठी मीटर रीडिंग एजन्सीच्या नियमित बैठका घ्यावात. ० आणि १ ते ३० युनिट वीज वापर असणाऱ्या ग्राहकांची काटेकोर तपासणी करावी, तात्पुरता व कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असणाऱ्या ग्राहकांवर लक्ष ठेऊन वीज चोरी आढळ्यास कठोर कारवाई करावी, असे निर्देश प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी या वेळी दिले.




सार्वजनिक दिवाबत्ती आणि पाणी पुरवठा योजनेच्या चालू बिलाची थकबाकी वसूल करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही करावी, कोणत्याही प्रवर्गातील ग्राहकांकडे थकबाकी असल्यास ती वसूल करावी, ग्राहक वीज बिलांचा भरणा करत नसेल तर त्याचा वीज पुरवठा खंडित करा तसेच या कामांत हयगय करणाऱ्या अभियंता,तांत्रिक कर्मचारी व इतरही कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी असेही निर्देश प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी बैठकीत दिले. गणेशोत्सव व सणाच्या काळात ग्राहकांना अखंडित वीज मिळेल यासाठी दक्ष राहणायचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

नागपूर प्रादेशिक विभागात लघुदाब घरगुती,वाणिज्यिक औद्योगिक आणि शासकीय कार्यालयाकडे सुमारे २२ लाख १७ हजार ०४१ लाख ग्राहकांकडे ९२३ कोटी ६८ लाख रुपयांची थकबाकी आहे. परिमंडलनिहाय ग्राहक व थकबाकीचे प्रमाण असे आहे. अकोला: थकबाकीतील ग्राहक ५,८७,८३१- थकबाकी- २५७ कोटी २३ लाख रुपये. अमरावती: थकबाकीतील ग्राहक ५,६८,४२६- थकबाकी- २३८ कोटी ७३ लाख रुपये,चंद्रपूर: थकबाकीतील ग्राहक - २,६०,७२३, थकबाकी- ६६ कोटी ९० लाख रुपये,गोंदिया : थकबाकीतील ग्राहक - १,८३,१९१ थकबाकी-३५ कोटी ८६ लाख रुपये, नागपूर परिमंडल: थकबाकीतील ग्राहक - ६,१६,८७० थकबाकी- ३२४ कोटी ९३ लाख रुपये.महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभागात एवढ्या मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने कंपनीला दैनंदिन खर्चही भागविणे अवघड होत आहे. त्यामुळे या वस्तुस्थितीची जाणीव ग्राहकांनाही करून द्या. कोरोना काळात असो वा मुसळधार पावसाच्या काळात महावितरणचे सर्व अधिकारी-कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा देत असतात. हे लक्षात घेऊन ग्राहकांना वीज बिल भरण्याचे आवाहन करावे, असे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी बैठकीत सांगितले.



या बैठकीत नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके,चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे, अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल डोये, गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता बंडू वासनिक,अमरावती परिमंडलाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण,महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार,नागपूर परिक्षेत्र कार्यालयातील अधीक्षक अभियंते हरीश गजबे,अविनाश सहारे,उपमहाव्यवस्थापक (माहिती व तंत्रज्ञान) प्रमोद खुळे,सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे सर्व परिमंडलाचे सर्व अधीक्षक अभियंते,कार्यकारी अभियंते उपस्थित होते.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.