चंद्रपूर : पर्यावरणाच्या संवर्धनासाठी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी यंदा महानगरपालिकेच्या माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून पर्यावरणस्नेही बाप्पा स्पर्धा ( #Eco #ganesha #CMC #Chandrapur) घेण्यात आली. यात घरगुती गणेश उत्सव आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यातील विजेत्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
पर्यावरणस्नेही बाप्पा स्पर्धा १० सप्टेंबरपासून सुरु झाली. स्पर्धेचे मूल्यमापन १७ सप्टेंबर रोजी झाले. मुल्यमापन समितीने सार्वजनिक गणेश मंडळ तथा घरगुती गणेश उत्सव करीता आलेल्या सहभाग्यांचे मुल्यमापण करुन निकाल जाहीर केला आहे.
सार्वजनिक गणेश मंडळ
प्रथम क्रमांक : श्री. नवयुवक बाल गणेश मंडळ
व्दितीय क्रमांक : भाऊ गणेश मंडळ, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर
तृतीय क्रमांक : सार्वजनिक गणेश मंडळ, सिव्हिल लाईन
घरगुती गणेश उत्सव
झोन क्रं. 1
प्रथम क्रमांक : किशोर सुधाकरराव माणुसमारे
व्दितीय क्रमांक : चैतन्य सचिन ठाकरे
तृतीय क्रमांक : प्रकाश बाळकृष्ण भांदककर
झोन क्रं. 2
प्रथम क्रमांक : डॉ. ममता अरोरा
व्दितीय क्रमांक : सुभाष लांजेकर
तृतीय क्रमांक : अविनाश मोतीराम देशट्टीवार
झोन क्रं. 3
प्रथम क्रमांक : प्रणय विटेकर
व्दितीय क्रमांक : एकता श्रीकांत पिट्टूवार
तृतीय क्रमांक : प्राची महाडीया
#Eco #ganesha #CMC #Chandrapur