Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, सप्टेंबर ०७, २०२१

गोरेवाडा प्रकल्पामध्ये फुलपाखरु महिन्याला सुरवात Butterfly month begins in Gorewada project

   दिनांक : 07 सप्टेंबर, 2021

गोरेवाडा प्रकल्पामध्ये

फुलपाखरु महिन्याला सुरवात

नागपूर दि. 07 : भारतामध्ये 2020 पासून सप्टेंबर महिना फुलपाखरु महिना म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने  काल  दि.6 सप्टेंबर रोजी गोरेवाडा प्रकल्पातंर्गत फुलपाखरु महिना  या उत्सवाची सुरूवात करण्यात आली. (Butterfly month begins in Gorewada project)

यावेळी गोरेवाडा जंगल ड्राईव्ह व बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानमधील गाईड यांच्यासाठी फुलपाखरांबद्दल अभिमुखता वाढविण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास सम्मेलन शेट्टी निर्मित बटरफ्लाय ऑफ इंडिया ही चित्रफित दाखविण्यात आली. तसेच कॉन्सरव्हॅटिनिस्ट ॲन्ड फाऊंडर ऑफ बटरफ्लाय पार्क बेलवाई यांचे ऑनलाईन संवाद साधण्यात आला. शेट्टी यांनी उपस्थित गाईड सोबत संवाद साधून शंकांचे समाधान केले. तसेच फुलपाखरुंच्या संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते, डब्ल्युआयआयचे प्रफुल भांबुरकर, टाईम्स ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक विजय पिंजरकर, गोरेवाडा प्रकल्प तसेच गोरेवाडा प्रकल्पातील वन्यप्राणी संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अधिकारी सहभागी झाले.

या कार्यक्रमाचे संचालन कल्पना चिंचखेडे, सहाय्यक व्यवस्थापक, औषधी वनस्पती शाखा, एफडीसीएम लि. यांनी केले.



Butterfly month begins in Gorewada project


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.