Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, सप्टेंबर ०८, २०२१

स्वत:ची वाट कींवा ओळख निर्मान करा... शिक्षक आमदार नागो गाणार



◼️सेवानिवृत्त मुख्याध्यापक गजानन शेळके यांचा सत्कार करतांना श्रीकृष्ण घड्याळपाटील

शिरीष उगे वरोरा/प्रतिनिधी
       :- वरोरा येथील कटारिया मंगल कार्यालय यात नुकताच सेवानिवृत्त मुख्याध्यापक गजानन शेळके लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वरोरा यांच्या कृतज्ञता सोहळा थाटात संपन्न झाला गजानन शेळके वयोमानानुसार ऑगस्ट 2021 ला सेवानिवृत्त झाले. लोकमान्य विद्यालय वरोरा येथे 1992 ला मुख्याध्यापक भाऊपाटील यांच्या कार्यकाळात सामान्य शेतकरी कुटुंबातील गजानन शेळके सहाय्यक शिक्षक म्हणून रुजू झाले. दहा मुख्याध्यापक यांच्या कार्यकाळात व  त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक शिक्षक पर्यवेक्षक व उपमुख्याध्यापक म्हणून काम केले. अकरावे मुख्याध्यापक म्हणून 2016 ला पदभार स्वीकारला नंतर लोकशिक्षण संस्थेच्या मार्गदर्शनात प्रबळ इच्छाशक्ती व अनुभवातून शालेय प्रशासन एकसूत्रता, क्रीडा संस्कृती, शालेय पायाभूत सुविधा, निकाल, विद्यार्थी संख्या, शिस्त, पालक, विद्यार्थी व शिक्षण विभागाची समन्वयातून घट्ट नाते जोडले.

       शिक्षक संघटनेच्या प्रदीर्घ अनुभवातून अनेक शिक्षक मुख्याध्यापकांचे प्रश्न मार्गी लावले. समाज व कुटुंब विषयी या भावनेने कुटुंब व समाजासाठी कष्ट व संघर्षातून भरीव कार्य केले अशा शांत संयमी मनमिळाऊ स्वभावाने सर्वांना आपलेसे केले.  त्यांच्या आयोजित कृतज्ञता सोहळ्याचे अध्यक्ष व लोकशिक्षण संस्थेचे कार्यवाह श्रीकृष्ण घड्याळपाटील यांनी गजानन शेळके यांच्या सेवेतील केलेल्या कार्याबद्दल प्रसंशा करून शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून त्यांना सन्मानित केले.  
        
       यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकशिक्षण संस्थेचे कार्यवाह श्रीकृष्ण घड्याळपाटील व प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आमदार नागपूर विभाग नागो गाणार, महाराष्ट्र नागपूर विभाग कार्यवाह योगेश बन, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मधुकर मुप्पीडवार, महाराष्ट्र राज्य संघटक नागपूर विभाग विनोद पांढरे, ज्येष्ठ साहित्यिक व ग्रामीण शिक्षण प्रसारण मंडळाचे सचिव आचार्य ना गो थुटे, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन जिल्हा अध्यक्ष कैलास उराडे, लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास कावलकर इत्यादी मान्यवारांच्या उपस्थितीत प्रथम राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली होती.

        या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक, कर्मचारी वृंद, मराशिपचे जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुका अध्यक्ष, सचिव व अन्य माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय मुख्याध्यापक शिक्षक, धनगर समाज संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शालेय जीवनातील मित्र परिवार तसेच शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
        कार्यक्रमाचे संचालन राहुल राखे यांनी व आभार प्रदर्शन विलास खोंड यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदान सरोज कथडे यांच्या मधुर वाणीने झाली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.