Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, सप्टेंबर ०९, २०२१

"बेंड द बार" मध्ये डेड लिफ्ट स्पर्धेचे आयोजन #bend #bar



शिरीष उगे,भद्रावती/प्रतिनिधी
            :- मुलांना फिटनेस बद्दल प्रोत्साहीत करण्या करिता "बेंड द बार" या जिम मध्ये डेडलिफ्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून समाज सेविका डॉक्टर माला प्रेमचंद व मा. निहाल अप्रजितवार यांच्या उपस्थितीत भद्रावती येथील बेंड द बार या जिम मध्ये स्पर्धा पार पडली.
स्पर्धेचे उद्घाटन मा.डाॅ.माला प्रेमचंद यांच्या हस्ते करण्यात आले. जिम मधील सदस्यापुर्ती स्पर्धेत 60 मुलांनी सहभाग घेतला.
55 किलो वजन गटातील गृप मध्ये प्रथम क्रमांक अमित शेंडे, द्वितीय क्रमांक हिमांशु बोरीकर, तृतीय क्रमांक श्रेयस मेश्राम यांनी पटकावला.
    60 किलो वजन गटात निहाल अप्रेटवार,प्रजव्ल पवार, आशिष किन्नाके तर 65 किलो वजन गटातील गृप मध्ये प्रथम क्रमांक सुरज मेश्राम,द्वितीय क्रमांक गोलू चौखे, तृतीय क्रमांक राहुल सातपुते, 75 किलो वजन गटातील प्रथम क्रमांक अमन पाटील, द्वितीय क्रमांक उत्कर्ष बांदूरकर,तृतीय क्रमांक रोहन पोईनकर, ओपन वजन गट मध्ये प्रथम क्रमांक अभिषेक वाढई, द्वितीय क्रमांक अनुप वाघमारे, तृतीय क्रमांक अतुल आवळे, तसेच मुलीच्या 48 किलो वजन गटातील प्रथम क्रमांक आचल नैताम, द्वितीय क्रमांक मेघना वासाडे, तृतीय क्रमांक जया बोरकर, 60 किलो वजन गटात प्रेरणा रणदिवे प्रथम द्वितीया प्रगती वाघमारे सगळ्या विजेते  स्पर्धकांचे  अध्यक्ष अरविंद वाघमारे यांच्यातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले .तसेच डॉक्टर मला प्रेमचंद यांनी स्पर्धेसाठी ऑलंपिक खेळात प्रयत्न करावे याकरिता 60 किलो वजन उचलून मुलांना प्रोत्साहित केले . स्पर्धेसाठी सौरभ पाटील, राजू कोंडे अमोल आवळे (कोच), अनुप वाघमारे पवन लोंढे यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहभाग घेतला.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.