मंगळवारी महिलांसाठी विशेष लसीकरण मोहिम
330 केंद्रांवर व्यवस्था : जास्तीत जास्त महिलांनी पुढाकार घेण्याचे आवाहन
नागपूर, ता. 19 : कोरोनाच्या संक्रमणाची साखळी खंडीत करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरणावर भर देण्यात येत आहे. याच श्रृंखंलेमध्ये आता महिलांसाठी लसीकरणाची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. पालकमंत्री डॉ.नितीन राउत यांच्या सूचनेनुसार मंगळवारी 21 सप्टेंबर रोजी शहरातील महिलांसाठी विशेष लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील 330 केंद्रांवर महिलांचे लसीकरण केले जाणार आहे. या विशेष लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त महिलांनी लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
प्रत्येक घरातील महिला या कुटुंबाचा प्रमुख आधार आहेत. त्या सुरक्षित राहिल्यास संपूर्ण घर सुरक्षित राहू शकतो. महिलांच्या सुरक्षा आणि संरक्षणाच्या दृष्टीने नागपूर शहरासह संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये मंगळवारी 21 सप्टेंबर रोजी महिला लसीकरण दिवस साजरा करण्यात येणार आहे. यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज असून यामध्ये गृहिणी, शासकीय, निमशासकीय, खा
कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरण अभियानांतर्गत शहरातील 160 केंद्रांवर नियमित लसीकरण सुरू असून ग्रामीण भागातील 170 केंद्रावर लसीकरण होणार आहे. या अभियानामध्ये महिला मागे राहू नयेत. याउद्देशाने शहरामध्ये विशेष ‘महिला लसीकरण दिवस’ साजरा करण्यात येत आहे. या विशेष मोहिमे मध्ये प्रत्येक महिलेने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.