Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, सप्टेंबर २९, २०२१

वनक्षेत्रपाल गट-ब या संवर्गातील 100 पदांसाठीचा निकाल जाहीर |

अहमदनगर जिल्ह्यातील वैभव दिघे वैभव दिघे राज्यात प्रथम




महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2019 मधून श्री. इंगळे नारायण दत्ता यांची वनक्षेत्रपाल, गट-ब पदावर निवड झाली आहे. शासनाकडून एप्रिल 2018 मध्ये अनाथ उमेदवारांकरीता आरक्षण लागू झाल्यापासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांमधून निवड झालेले ते पहिले अनाथ उमेदवार आहेत.



महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महसूल व वन विभागातील सहायक वन संरक्षक, गट- अ तसेच वनक्षेत्रपाल गट-ब या संवर्गातील 100 पदांसाठी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा -2019 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

या परिक्षेत अहमदनगर जिल्ह्यातील वैभव दिघे हा राज्यातून तसेच मागासवर्गीय प्रवर्गातून प्रथम आला आहे. तर पुणे जिल्ह्यातील पूजा पानसरे हिने महिला प्रवर्गातून राज्यात प्रथम येनाचा मान मिळवला आहे.

 
तसेच वनक्षेत्रपाल पदाकरीता खेळाडूंसाठी आरक्षित असलेल्या 4 पदांचा तसेच अन्य तीन पदांचा निकाल प्रशासकीय कारणास्तव राखून ठेवण्यात आला आहे. यामध्ये अन्य एका उमेदवाराचा निकालदेखील राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या पदांची यादी तसेच निवडण्यात आलेल्या उमेदवारांची नावे नंतर जाहीर केले जातील. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा परीक्षा 2019 चा अंतिम सुधारित निकाल 28 सप्टेंबर रोजी जाहीर केला होता. एमपीएससीनं या सदंर्भात परिपत्रक जारी केलं होतं. एमपीएससी 2019 राज्यसेवा परीक्षेतील 413 पदांचा निकाल जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. एमपीएससी 413 पदांचा निकालाची विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षा होती. अखेर निकाल अखेर जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांनी राज्य सरकारचे आभार मानले होते. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 चा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर पाहता येईल.


महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2019 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

https:// https://mpsc.gov.in/downloadFile/english/4088

2019 चा निकाल

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.