Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑगस्ट १९, २०२१

नक्षलग्रस्त असरअलीच्या ZP शिक्षकास राष्ट्रीय पुरस्कार

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील असरअली येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक #खुर्शिद_शेख यांची केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आज देशभरातून १५५ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे.



खुर्शीद शेख गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या असरअली (ता.सिरोंचा) शाळेत शिक्षक आहेत. त्यांनी मुलांना आनंद देणाऱ्या शिक्षणाच्या पद्धती विकसित केल्या. ही शाळा तेलंगण-छत्तीसगडच्या सीमेवर असल्याने मुलांवर तेलुगूचा जास्त प्रभाव आहे. या मुलांना मराठीतून शिक्षण देण्यासाठी विशेष प्रयत्न शेख यांनी केले. त्यासाठी त्यांनी मी रिपोर्टर, नाटिका आदी उपक्रम राबविले.

मुलांना बरोबर घेऊन अकरा लघुपट त्यांनी बनविले. मुलांना आवडते, त्यानुसार शिक्षणाच्या पद्धती तयार केल्या पाहिजे. त्यासाठी शिक्षकाने बदलले पाहिजे. केवळ नकारात्मक दृष्टिकोन ठेऊन चालणार नाही. विद्यार्थ्याची अभिरुची ओळखून शिक्षणाने अध्यापन केले पाहिजे. या पद्धतीने शिक्षण क्षेत्र आमूलाग्र बदलाच्या दिशेने जाऊ शकेल, खुर्शीद शेख (राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक) यांनी सांगितले.


National Award for zp Teachers Gadchiroli



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.