शिरीष उगे वरोरा/प्रतिनिधी
: ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. डेंण्गुच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने दि ट्रॅक फिटनेस क्लब वरोरा च्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनाचे अवैचित्त साधुन भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उदघाटन दि ट्रॅक फिटनेस क्लब चे संचालक संजय रणदिवे, आशिष रणदिवे, सुहास रणदिवे, निलेश देवतळे, संजीवन ब्लड बँक चे डॉ. रीमा निनावे व कर्मचारी उपस्थिती होते. उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे, यांनी रक्तदान करून रक्तदान शिबिरास सुरवात करण्यात आली. यावेळी आशिष रणदिवे यांनी दि ट्रॅक फिटनेस क्लबची भूमिका मांडली.
याप्रसंगी माजी सैनिक सागर काहाळे, प्रवीण चिमुरकर, रवी तुरणकर यांचा दि ट्रॅक फिटनेस क्लब तर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
ही आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरुणाईने अधिकाअधिक रक्तदान करण्याचे आवाहन केले.
शिबिरात जवळपास शेकडो दि ट्रॅक फिटनेस क्लब सदस्यांनी रक्तदान केले. सामान्य जनतेस हा मदतीचा हात मिळावा, या अनुषंगाने हा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते व संचालकांनी सर्व रकतदात्यांचे आभार मानले.
या शिबीरास नगराध्यक्ष अहेतेशाम अली, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे, सादीक अली, शिवसेना तालुका प्रमुख मुकेश जीवतोडे, भाजपा युवा नेते करण संजय देवतळे, प्रवीण सुराणा, अभय मडावी, महेश श्रीरंग, निशिकांत डफ, इत्यादी पदाधिकारीनी भेट दिली. याकार्यक्रमाचे संचालन आशिष रणदिवे यांनी केले तर आभार सुहास रणदिवे यांनी मानले तर यशस्वीतेकरिता निशा सिंग, शुभम चिकटे, अक्षय वाढई, सचिन गुजर, राहुल देउळकर, नितीन भोजेकर, शिरीष उगे, अंकुश काकडे, छाया कडलूके, सविता बावणे हे होते.