Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑगस्ट १२, २०२१

राहुल यांचे काश्मीरी चिमटे..!




लोकांचे जगण्या-मरण्याचे प्रश्न. ते काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत. 9 आँगस्ट क्रांती दिन. त्या दिवशी कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी काश्मीर गाठले. कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्या भाषणात त्यांनी जोरदार चिमटे काढले. चिमटा मोदींना होता. तेवढाच तो गुलाबनबींना होता. हिंसाचार माजविणाऱ्यांनाही हेता. या चिमट्यांची चर्चा जोरात आहे.अर्थ ज्याला जसा काढावयाचा तसा काढण्यास मोकळे. राहुल मोजके बोलले. चांगले बोलले. भाषा प्रेमाची होती.आपुलकीची होती. तेवढीच टोकदार होती. काश्मीरसोबत जोडण्याची होती. राहुल म्हणाले, माझा परिवार दिल्लीत राहतो. अलाहाबादेतून दिल्लीत आला. त्या अगोदर काश्मीरमध्ये होता. तुमचा विचार काश्मीरियत. त्यांचा काही अंश माझ्यातही असेल. राजकीय दृष्ट्या मोठा राज्य नाही.आता तर राज्यही राहिला नाही. राज्यापेक्षा मोठी आहे काश्मीरियत. तिची आोळख बंधूभाव. जगण्याची तऱ्हा प्रेमाची. प्रेम देण्याची. तिच रित माझी. प्रेम व सन्मान देण्याची. द्वेष,बळजोरीची नाही. काश्मीरींना प्रेम, सन्मान आणि गळाभेटीने जिंकता येते. द्वेष, हिंसा व बळजबरीने नाही. मोदी सरकारचा जम्मू-काश्मीवरच नाहीतर संपुर्ण देशावर आक्रमण आहे. फरक एवढाच आहे. इथे सरळ आक्रमण आहे. प.बंगाल, तामीळनाडूसह अन्य राज्यांवर अप्रत्यक्ष आक्रमण आहे.

गुलाब नबी यांच्या भाषणाचा हवाला देत राहुल म्हणाले. काश्मीर प्रश्नांवर संसदेत आवाज उचलावा. मात्र हे सरकार विरोधी पक्षांना संसदेत बोलूच देत नाही. ना लोकसभेत, ना राज्यसभेत. पेगॅसस, राफेल, काश्मीर, शेतकरी विरोघी कायदे, कोरोना, व्यवसाय, बेरोजगारीच्या प्रश्नांवर. न्यायालयांवरही आक्रमण आहे. लोकशाहीला पूरक असलेल्या संस्थांनाही दाबले जाते. हा लोकशाहीवर हल्ला आहे.ती वाचवावयाची आहे. गुलाब नबी राज्यसभेत होते. तेव्हा 370 कलम रद्द केले. याचे अप्रत्यक्ष स्मरण करून दिले. हा चिमटा गुलाब नबींना होता. धीरे से जोर का धक्का म्हणतात. तो असा. प्रसंग होता. श्रीनगरातील कॉंग्रेस पक्ष कार्यालय उदघाटनाचा. या दौऱ्यात त्यांनी काश्मीरी पंडितांच्या प्रसिध्द भवानी माता मंदिरात दर्शन घेतले. हे दर्शन भाजपवाल्यांना झोंबले. त्यांची प्रचिती संबित पात्राच्या विधानात झळकते. मी या अगोदरच येणार होतो. मला रोखण्यात आले. विमानतळावरून परत पाठविले. मी नवीन संदेश देण्यास आलो. मी तुमच्या सोबत आहे. मोदींच्या विरोधात लढत आहे. लढत राहणार. मोदी द्वेष व हिंसेचे प्रतिनिधित्व करतात. मी तुमच्यासाठी सन्मान व प्रेमाचा संदेश आणला. स्टेट वापस मिळावे. ते लोकशाही मार्गाने.त्यासाठी काश्मीरात आलो. पुन्हा येणार. जम्मू व लद्दाखला सुध्दा जाणार. आमची लढाई हिंसा व दडपशाही विरोधात आहे. या शब्दांनी हिंसाचार माजविणाऱ्यांचा चिमटा काढला.
काश्मीरात स्फोटांचा स्वैराचार आहे. राहुल गांधी यांच्या कार्यक्रम स्थळाच्या 500 मीटर अंतरावर स्फोट झाला. यावर राहुल गांधी यांना संपवयाचे आहे काय.. या शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चिंता व्यक्त केली.असे घडले असेल तर ते गंभीर आहे. काश्मीर सेना व अर्धसैनिकांच्या ताब्यात आहे. श्रीनगरात तर ते सर्वत्र आहेत .या स्थितीत असं काही घडणं बरोबर नाही. गांधी परिवार सुरक्षेत असतो. राहुल यांच्या दौऱ्यात सरकारने आवश्यक खबरदारी घेतली असावी. तरी शेजारी स्फोट होणे. सुरक्षेत ढिलाई असेच म्हणावे लागेल. प्रदेशाध्यक्षाचा आरोप असल्याने तो गंभीर आहे. चिंता वाढविणारा आहे.

जंतर मंतर...

राहुल गांधी यांच्या काश्मीरी दौऱ्याचे निमित्त साधून एक दिवसा अगोदर जंतर मंतर कांड झाले.संसदेपासून काही अंतरावर.संसद अधिवेशन चालू असताना लोक एकत्र येतात. विशिष्ट समुदायाच्या विरोधात नारेबाजी केली जाते. पोलिस सहमतीशिवाय शक्य नाही. शेतकऱ्यांना रोखण्यास काटेरी तार लावली जाते. खिळे ठोकले जातात. दिल्लीच्या बॉर्डरवरच रोखले जाते. दुसरीकडे प्रतिबंधित क्षेत्रात लोक येतात.सभा घेतात. भाषणबाजी होते. तेढ माजविणारे नारे लावले जातात. त्यांना कुठेही पोलिस रोखत नाही. जेव्हा व्हिडीओ वायरल होते. टीका होते. तेव्हा पोलिसांना जाग येते. गुन्हा दाखल होते. वकिलासह सहा जणांना अटक होते.अचानक हे घडतं कसं. या मागचे नियोजन कोणाचे!असे अनेक मुद्दे आहेत. लोकशाही विरोधी कृत्यांचा केजरीवालकडून निषेध नाही.भाजपही निषेध करीत नाही. हे मौन चिंताजनक आहे. प्रायोजित असल्याशिवाय त्या भागात जमाव शक्य नाही. हे तेवढेच खरे.

-भूपेंद्र गणवीर
......................BG......................

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.