सरचिटणीस मा , हेमंत भाऊ गडकरी, सरचिटणीस सौ रिता ताई गुप्ता यांच्या आदेशानुसार शहर अध्यक्ष विशाल बडगे , शहर उप प्रमुख प्रशांत निकम , पुर्व विभाग अध्यक्ष उमेश उत्तखेडे, यांच्या मार्गदर्शनात शहर अध्यक्षा महीला सेना नागपूर तर्फे सौ मनीषा पापडकर यांच्या नेतृत्वात प्रभाग क्रमांक ३१ मधील शहीद स्मारक नावाने ओळखले जाणारे शाहू गार्डन सोमवारी पेठ येथील गार्डन मध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहे कित्तेक ठिकाणी सांडपाणी साचलेले आहे . डेंग्यू, मलेरियाची साथ सुरू आहे . लोकांचे आरोग्य धोक्यात आहे. लहान मुले, वयस्क नागरिक, महिला रोज सकाळी फिरायला येतात. गवत वाढलेले असल्यामुळं बाकावर बसता येत नाही. जीव जंतू कीडे याचा प्रादुर्भावामुळे लोक त्रस्त झाले आहेत वारंवार तक्रार करूनही स्थानिक नगरसेवक आणि मनपा प्रशासन लक्ष देत नव्हते जीव गेल्यावरच प्रशासन जागे होतात काय? असे अनेक प्रश्न स्थानिक नागरिक करत होते . आमच्या कडे कुणीही लक्ष देत नाही असे नागरिक ओरडत होते.त्यामुळे आज महिला सेना नागपूर तर्फे गवत काढा आंदोलन करण्यात आले आणि तेच गवत कापून हनुमान नगर झोन सहायक आयुक्त सुषमा मांडगे यांच्या कार्यालयात टाकून शाहू गार्डन सोमवारी पेठ येथील सर्व समस्या लक्षात आणून दिल्या तसेच ताबडतोब या गार्डन मधील गवत कापून फवारणी करावी असे निवेदन सादर केले जेणेकरून वॉर्ड मधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही.
या सर्व समस्या सहायक आयुक्त सुषमा माडगे (हमुनान नगर झोन ३ )यांनी ऐकून घेऊन दोन दिवसात संपुर्ण गवत काढून टाकण्याचे आदेश आरोग्य अधिकारी कलोंडे यांना देण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष विशाल बडगे, शहर उपाध्यक्ष प्रशांत निकम, महिला सेनेच्या शहर अध्यक्षा सौ मनीषा आनंद पापडकर, पूर्व विभाग अध्यक्ष उमेश उत्तखेडे, दक्षिण विभाग अध्यक्ष पिंटू बिसेन, शहर सचिव सौ अर्चना कडू, सह सचिव स्वाती जेसवाल , विभाग अध्यक्ष मंजुषा पाणबुडे, शहर उप प्रमुख पुनम चाडगे, विभाग सचिव लोकेश कामडी, विभाग उपाध्यक्ष अंकित झाडे, दक्षिण प्रसिद्ध प्रमुख राज अंबोरे, प्रभाग अध्यक्ष शुभम श्रीवास्तव, आनंद पापडकर, विकास वांद्रे, राज बहिर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
MNS grass cutting movement