Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑगस्ट २९, २०२१

करंजीचे झाडाची फांदी तोडण्यासाठी गेलेल्या बालकाचा जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने मृत्यू #Death #child #liveelectric



शिरीष उगे भद्रावती/प्रतिनिधी
चंद्रपूर नागपूर महामार्गावर नंदोरी येथे शेतालगत असलेल्या करंजीच्या झाडावरील फांदी तोडण्यासाठी गेलेल्या बालकाचा जीवंत विद्युत तारेचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची घटना दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास नंदोरी शेत शिवारात घडली गौरव माधव हरणे वय 14 रा. नंदोरी असे मृतक बालकाचे नाव आहे.

भद्रावती तालुक्यातील चंद्रपूर-नागपूर महामार्गावर नंदोरी येथील माधव करणे यांचे शेत महामार्गावर लागलेल्या लागलेले आहे हरणे यांच्या शेतातून वीज वितरण कंपनीची ते 3300 केव्ही उच्च दाब विद्युत वाहिनी वरोरा सब स्टेशन मधून कोंढा भद्रावती सब स्टेशनला गेली आहे. गौरव हरणे हा बालक नेहमीप्रमाणे आपल्या शेतात जात होता शेतातील पिकांना खुंटे लावण्यासाठी गौरव सकाळी कुराड घेऊन गेला मात्र तो सायंकाळ होऊनही घरी परतला नसल्याने घरच्यांनी शोधाशोध घेतली असता शेतात असलेल्या करंजी च्या झाडावर गौरव चा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत शेतातून येणाऱ्या नागरिकांना दिसला गौरव हा कमी वयात आपल्या वडिलांना शेतीच्या कामात मदत करीत होता. त्यांच्या मृत्यूने समाजमन सुन्न झाले असून नंदोरी परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी नंदोरीकर यांनी एकत्र गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच वीज वितरण कंपनीने अधिकारी घटनास्थळी पोहोचून वीज पुरवठा खंडित करून गौरवचा मृतदेह झाडावरून काढण्यात आला. वरोरा पोलीस घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. गौरव चा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात वरोरा येथे नेण्यात आले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.