नांदाफाटा लसीकरण केंद्रावर नागरिकांची तोबा गर्दी
लसीचे डोस वाढवण्याची गरज
नांदाफाटा औद्योगिक परिसरात लोकसंख्येच्या अनुपातात लसीकरण कमी झाले असल्याने तसेच ३० दिवस येथील लसीकरण केंद्र बंद होते त्यामुळे दिनांक १६ ऑगस्ट व १८ ऑगस्ट रोजी लसीकरण केंद्रावर नागरिकांची तोबा गर्दी होती जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने येथील लसीकरण केंद्रावर जास्तीत जास्त लस उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे यांनी केले आहेत
नांदा बिबि आवारपुर ही गावे औद्योगिक क्षेत्रात येत असल्याने या तिन्ही गावची लोकसंख्या जवळपास ३५ हजारचेवर आहे याठिकाणी लोकसंख्येच्या अनुपात नागरिकांचे लसीकरण झालेले नाहीत तसेच नांदाफाटा येथील लसीकरण केंद्रांवर तीस दिवस उपलब्ध नव्हती त्यामुळे येथील लसीकरण केंद्रावर नागरिकांची तोबा गर्दी असते स्थानिक प्रशासनाला गर्दी नियंत्रण करण्यास फार अडचणी होतात लसीकरण करणार्या आरोग्य विभागाच्या चमूवरही मोठा ताण असतो येथील लसीकरण केंद्रावर नागरिकांची प्रचंड गर्दी पाहता येथील लसीकरण केंद्रावर नियमित लस उपलब्ध करून जास्तीचे डोस देण्यात यावे अशी मागणी येथील जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे यांनी जिल्हा परिषदेकडे केले आहेत कोरपना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनीही येथील लसीकरण केंद्रावर नियमित लसीचा पुरवठा करून आगाऊ लस उपलब्ध करून देण्याबाबत शासन स्तरावर उचित माहिती सदर करुन पाठपुरावा करण्याची गरज आहे जेणेकरून येथील गर्दी टाळून नागरिकांचे लसीकरण करणे सोयीचे होईल