औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील हतनुर येथील राष्ट्रीय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, व राष्ट्रीय कॉलेज ऑफ फार्मसी, व राष्ट्रीय विद्यालय हतनूर येथे आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज (रविवारी) प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री. कैलास आबा अकोलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी श्री. डी.व्ही. गढरी यांच्या कडून सलामी सूचना देऊन घोषणा देण्यात आल्या. ह्या प्रसंगी सरपंच, उपसरपंच व सर्व ग्राम पंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, पत्रकार, ग्रामस्थ, प्राचार्य डॉ. के.जी. शिंदे, प्राचार्य डॉ. एस. जी. खनगे, मुख्याध्यापक श्री. एस. एस. निकम. सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते.
महाविद्यालय परिसरात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. नंतर राष्ट्रीय कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले, कार्यक्रमासाठी लाभलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे, पत्रकार व ग्रामस्थांचे ग्रंथपाल दिपक भगुरे यांनी सर्वांचे आभार मानले. चहा नाष्टा देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.