राज्यात दहावी आणि बारावीचा निकाल विशेष मूल्यांकन पद्धतीने लावण्यात आला होता - मात्र जे विद्यार्थी या पद्धतीच्या निकालाबाबत संतुष्ट नसतील .
📝 अशा विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार योजनेनुसार परीक्षा देता येणार आहे - तसेच पुनर्परीक्षार्थी आणि खाजगी विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार - असे शिक्षण मंडळाने सांगीतले
● राज्य शिक्षण मंडळाने - पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याची तारीख जाहीर केली आहे - त्यानुसार परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 11 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट दरम्यान असणार आहे
● या तारखेत विद्यार्थ्यांना नियमित शुल्क भरून अर्ज करता येईल - तसेच अकरावी प्रवेश प्रक्रियेची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली आहे
📍 अकरावी प्रवेशासाठी विदयार्थ्यांना 16 ऑगस्टपासून ऑनलाइन पद्धतीन अर्ज करता येणार आहे