Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जुलै १८, २०२१

अवैध रेती तस्करीचा प्रशिक ठरला बळी


▪️अवैध रेतीच्या ट्रॅक्टरने तरुणाला उडविले


▪️आसन खुर्द येथील घटना



कोरपना : अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला दुचाकी धडकल्याने युवकाला जीव गमवावा लागला. ही घटना 17 जुलैला रात्री 10. 30 वाजता आसन खुर्दच्या नाल्याजवळ घडली. प्रशिक सुरेश शेंडे ( 23) रा. आसन खुर्द असे मृतक युवकाचे नाव आहे. तो नांदाफाटा येथे मावशीच्या घरी जेवण करून गावी परतत असताना अगदी गावाजवळ त्याची दुचाकी ट्रॅक्टरला धडकली. डोक्याला गंभीर दुःखापत झाल्याने तो तिथेच पडून राहिला. ट्रॅक्टर पिपर्डा येथे पसार झाले. ग्रामस्थांना कळताच त्वरित उपचारासाठी हलवत असताना त्याचा प्रशिकचा मृत्यू झाला. गावलगतच्या नाल्यात मधुकर किन्नाके यांच्या शेताजवळ जेसीबीने वाळूचा अवैध उपसा करून तीन ट्रॅक्टरने वाहतूक सुरू होती. त्यापैकी पिपर्डा येथील तिखट यांचे ट्रॅक्टर आसन खुर्द येथे रेती टाकून पुन्हा रेती आणायला जात असताना अनपेक्षितपणे ट्रॅक्टर समोर आल्याने दुचाकी धडकली.

गडचांदूर पोलिसांनी ट्रॅक्टर चालकमालक तिखट याला अटक केली असून ट्रॅक्टर जप्त केला आहे. अगदी गडचांदूर - कोरपना राज्य मार्गालगत जेसीबीने उपसा करण्याची हिम्मत केली जात असेल तर हे तालुका प्रशासन झोपेत आहे किंवा झोपेचे सोंग घेऊन असल्याचेच लक्षण आहे. संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.