Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जुलै ०४, २०२१

ब्रम्हपूरी क्षेत्रातील रस्त्यांच्या कामासाठी ११ कोटी : सावली तालुक्यातील निफंद्रा, मेहा, गेवरा येथील रस्त्यांचा समावेश

ब्रम्हपूरी क्षेत्रातील रस्त्यांच्या कामासाठी ११ कोटी : सावली तालुक्यातील निफंद्रा, मेहा, गेवरा येथील रस्त्यांचा समावेश  

चंद्रपूर -  ब्रम्हपूरी क्षेत्रातील ब्रम्हपूरी, सावली आणि सिंदेवाही तालूक्यातील ग्रामीण भागातील काही रस्त्ये रहदारीस अयोग्य असल्यामुळे हे रस्ते तातडीने दुरुस्त करण्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध होण्यासाठी या क्षेत्राचे आमदार व जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेटटीवार यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागभीड यांना शासनाने कडे सर्वे करुन प्रस्ताव सादर करण्यासाठी सुचना केल्या. शासनानकडे प्रस्ताव प्राप्त होताच त्यांनी केलेल्या नियोजनामुळेच व केलेल्या प्रयत्नामूळेच ब्रम्हपूरी क्षेत्रातील ब्रम्हपूरी, सावली व सिंदेवाही तालुक्यातील विविध विकासकामासाठी रस्ते व पूल नरिरक्षण व दुरुस्ती कार्यक्रम सन २०२१-२२ अंतर्गत रस्ते दुरुस्ती कार्यक्रम या योजनेंतर्गत ११ कोटी २ लक्ष रुपयांच्या कामांना दिंनांक १ जुलै २०२१ च्या आदेशानुसार प्रशासकीय मान्यतेसह निधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.


         रस्ते व पूल नरिरक्षण व दुरुस्ती कार्यक्रम सन २०२१-२२ अंतर्गत रस्ते दुरुस्ती कार्यक्रम या योजनेंतर्गत विकासकांना या योजनेतंर्गत  ब्रम्हपूरी तालुक्यातील मेंडकी टेकरी जावराबोडी जुगनाडा बेटाळा सोनेगाव सावलगाव चिखलगाव लाडज रस्ता प्रजिमा ७८ किमी ४/२०० ते ५/५००, ५/६०० ते ६/६०० व ७/५०० ते ८/५०० मध्ये रस्ता, सिडी वर्क व पोचमार्गासह पूरहानीमुळे दुरस्ती करणे १ कोटी रुपये, ब्रम्हपूरी तालुक्यातील रामा ३६८ ते मालडांगरी धामणगाव वायगाव गोवारपेठ राजोली ते पप्रजिमा ३३ किमी ०/०० ते १/०० मध्ये पूरहानीमुळे दुरस्ती करणे १ कोटी ५० लक्ष रुपये, सावली तालुक्यातील बुज सामदा देवटोक ते केरोडा व्याहाड बुज सामदा बुज सोनापूर पेटगाव उपरी रस्ता प्रजिमा-४८ किमी ०/०० ते २६/५०० प्रत्यक्षात किमी २१/५०० ते २२/००, २३/५०० ते २४/००, २४/१०० ते २५/००, २५/०५० ते २६/५० आणी २६/०५० ते २६/५०० मध्ये पूरहानीमुळे दुरस्ती करणे १ कोटी १० लक्ष रुपये, सावली तालुक्यातील रामा ३७५ ते उसरपार चक पालेबारसा सायखेडा गेवरा बुज ईजिमा -६९ ते बारसागड मेहा बुज ते रामा -३७५ ला जोडणारा रस्ता प्रजिमा ११८ किमी ०/०० ते ३/०० मध्ये पूरहानी दुरुस्ती करणे १ कोटी ५० लक्ष रुपये, सावती तालुक्यातील आकापूर करोली विहिरगाव निफंद्रा ते प्रजिमा २९ ला जोडणारा रस्ता प्रजिमा १२० किमी १५/०० ते १५/५०० आणि १५/६०० ते १६/५०० मध्ये पूरहानीमुळे दुरस्ती करणे ६२ लक्ष रुपये,


सावली तालुक्यातील बोथली सावली सिर्सी हरंबा उपरी कापसी व्याहाड रस्ता प्रजिमा २८ किमी १०/०० ते ११/०० मध्ये पूरहानीमुळे दुरस्ती करणे ९० लक्ष रुपये, सावली तालुक्यातील बोथली सावली सिर्सी हरंबा उपरी कापसी व्याहाड रस्ता प्रजिमा २८ किमी १७/०० ते १८/०० मध्ये पूरहानीमुळे दुरस्ती करणे १ कोटी रुपये, सावली तालुक्यातील बोथली सावली सिर्सी हरंबा उपरी कापसी व्याहाड रस्ता प्रजिमा २८ किमी २०/०० ते २१/०० मध्ये पूरहानीमुळे दुरस्ती करणे ९० लक्ष रुपये, सिंदेवाही तालुक्यातील पेटगाव राजोली तांबेगडी मेंढा रस्ता प्रजिमा २६ किमी ११/७०० ते १२/५००, १२/६०० ते १३/४००, १३/५०० ते १४/४००, १४/५०० ते १५/५०० आणि १५/६०० ते १६/९०० मध्ये पूरहानीमुळे दुरस्ती करणे १ कोटी ३० लक्ष रुपये अशा प्रकारे ११ कोटी २ लक्ष रुपये निधी मंजूर करुन या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. 



#road #bramhapuri #chandrapur #saoli



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.