Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जुलै ०४, २०२१

कोरोनामुळे निराधार कुटूंबाला आर्थिक मदत



सावली तालुक्यातील अनेक व्यक्ती कोरोनामुळे मृत्यू झाले.यात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला तर काही वडीलपासून तर कुणी आईच्या मायेला पोरके झाले.अशातच कुणाचं आर्थिक आधार हिरावून घेतला. अशा परिस्थितीमध्ये कुटूंबातील  व्यक्तीला आधाराची गरज असते.याची जाणीव ठेवून आपण आपल्या समाजासाठी काहीतरी देणं असत याची जाणीव ठेवून महाराष्ट्र राज्याचे बहुजन विकासव आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. ना.विजयभाऊ वडेट्टीवार 

यांनी तालुक्यातील कोरोनामुळे मृत परिवाराला आर्थिक मदत करीत आहेत.अशातला एक भाग विरखल येथील विलास माधव मेश्राम यांचा कोरोनामुळे निधन झाले त्यांच्या मागे पत्नी,व दोन मुले होते. त्यांना यावेळी आर्थिक मदत देण्यात आली यावेळी विजयभाऊ वडेट्टीवार यांचे स्वीय सहाय्य श्री प्रदीपभाऊ गद्वेवार,श्री आशिष भाऊ पुण्यपवार,श्री अतुल येलेट्टीवार,ईश्वर गंडाटे, प्रभाकर डहलकर,यावेळी उपस्थित होते.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.