Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जुलै ०२, २०२१

Maharastra HSC Result बारावी निकालाची मूल्यमापन पद्धत जाहीर | असा असेल फार्मुला




बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण शिक्षण शिक्षण मंडळाने बारावीच्या निकाला च्या संदर्भातील मूल्यमापन पद्धत जाहीर केली आहे त्यानुसार बारावी निकालासाठी सीबीएससी पॅटर्न चा वापर करण्यात येत असल्याचे दिसत आहे शैक्षणिक वर्ष 2020 -21 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी साठी मूल्यमापन कार्यपद्धत जाहीर करण्यात आली आहे यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. पाहूयात कशी आहे ही कार्यपद्धती


 इयत्ता दहावी मधील बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांच्या सरासरी गुण यावर आधारित 30 टक्के गुण ग्राह्य धरले जातील. तर दुसरीकडे अकरावी परीक्षेच्या वार्षिक मूल्यमापन आतील विषय निहाय गुण याचा 30 टक्के विचार केला जाईल इयत्ता बारावी वर्षभरात अंतर्गत मूल्यमापन 

यातील  विषयनिहाय गुण 40% ग्राह्य धरले जाणार आहेत शैक्षणिक वर्ष 2020 - 21 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावी आणि इयत्ता अकरावी या दोन्ही इयत्तासाठी संपादणूकीचे  वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून वार्षिक निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत covid-19 च्या  प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष 2020 -21 मध्ये राज्यातील विविध भागातील उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय त्या स्थानिक परिस्थितीमुळे एकाच वेळी सुरू होऊ शकल्या नाहीत तसेच राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या मूल्यमापन प्रक्रियेतील प्रथम सत्र, सराव परीक्षा, सराव चाचण्या तसेच मूल्यमापन त्यापैकी सर्व परीक्षा घेण्यात आल्या आहेत असे नाही त्यामुळे बारावी परीक्षा सन 2021 साठी प्रविष्ट विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना लेखी/ तोंडी /प्रात्यक्षिक अंतर्गत मूल्यमापन त्यासाठी विविध यासाठी निर्धारित केलेले गुण कायम ठेवण्यात यावेत .

दहावी मार्क्स 30% 

11 इयत्ता मार्क्सवादी यावर सरासरी 30 टक्के 

12 इयत्ता सात इयत्ता यासाठी अंतर्गत परीक्षा यावर 40 टक्के गुण असतील 

देशातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला.

विद्यार्थ्यांचे  आरोग्य व सुरक्षितता लक्षात घेऊन बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून मूल्यमापन प्रक्रिया शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी आज जाहीर केली .

गुण  विभागणी तोंडी/ प्रात्यक्षिक/ लेखी विषय विषय द्विलक्षी (व्यवसायिक) अभ्यासक्रम व्दिलक्षी (व्यवसायिक) अभ्यासक्रम 

 व्यवसाय अभ्यासक्रम (MCVC) व्यवसाय अभ्यासक्रम अंतर्भूत आहे. विद्यार्थ्यांची इयत्ता 10 मधील मंडळाच्या परीक्षेतील संपादणूक इयत्ता 11 अंतिम निकालातील व व इयत्ता 12 वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन विचारात घेऊन निश्चित करण्यात येतील .उपरोक्त प्रमाणे लेखी परीक्षेसाठी निर्धारित एकूण गुणांपैकी 30 टक्के गुण इयत्ता 10 वी मधील मंडळाच्या परीक्षेतील संपादणूक 30 टक्के गुण 11 वी चा अंतिम निकाल आतील संपादणूक व 40 टक्के गुण इयत्ता 12वीच्या वर्षभरातील अंतर्भूत लेखी मूल्यमापन यानुसार भारांश विचारात घेऊन दिले जातील. इयत्ता दहावीसाठी भारांश प्राप्त गुण  निश्चित करताना मंडळाच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण असलेले तीन विषय विचारात घेतले जातील इयत्ता बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापन  प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा ,सराव चाचणी तत्सम  मूल्यमापन यातील विषयनिहाय गुण लक्षात घेतले जातील

श्रेणी विषयाचे मूल्यमापन

 श्रेणी  विषयासाठी विविध पद्धतीने  या वर्षी मंडळाने दिलेल्या विशेष मार्गदर्शन सूचना विचारात घेऊन गुणदान करून विद्यार्थ्यांना प्राप्त झालेल्या श्रेणी संगणक प्रणाली मध्ये नमूद करण्यात उपरोक्त कार्यप्रणाली नुसार अंतिम करण्यात आलेल्या एका निकालाने समाधान न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी covid-19 ची परिस्थिती सर्वसामान्य झाल्यानंतर राज्य मंडळाने मंडळामार्फत प्रचलित पद्धतीनुसार आयोजित केल्या जाणाऱ्या लगतच्या  या परीक्षांमध्ये श्रेणी सुधार  योजने अंतर्गत लागू होणाऱ्या एक किंवा दोन संधी उपलब्ध असतील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा श्रेणी सुधार योजने चे (class Improvement Scheme) सर्व नियम या विद्यार्थ्यांना लागू असतील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रविष्ट असलेल्या बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.