Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जुलै १७, २०२१

यंदा अकरावीच्या प्रवेशासाठी अशी होणार परिक्षा


Information of CET to take Admission to std.Xl



राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा न घेता त्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.मात्र दहावी निकालासाठी विविध परीक्षा मंडळाकडून शाळा स्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन लक्षात घेता अकरावी प्रवेशासाठी एकवाक्यता राहावी व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी (optional) सामायिक प्रवेश परीक्षा (CET) जुलै महिना अखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली जाणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने या सीईटी संदर्भात एक शासन निर्णय जारी केला आहे.अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी पूर्णत: ऐच्छिक असणार आहे .CET परीक्षा ही दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल
सदर परीक्षेचे प्रश्नपत्रिकेमध्ये खालील विषय असतील .
1)इंग्रजी
2)विज्ञान
3)गणित
4)सामाजिक शास्त्र
वरील विषयांवर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न असतील परीक्षा ऑफलाइन घेण्यात येईल प्रश्नपत्रिकेवर स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective MCQ) स्वरूपाचे असतील परीक्षा ही ओमआर (OMR) पद्धतीने घेतली जाईल.
सीईटी परीक्षा 100 गुणांची असेल आणि त्यासाठी एकच प्रश्नपत्रिका असेल परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल सामायिक प्रवेश परीक्षा ही शिक्षण आयुक्त यांच्या देखरेखीखाली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात येईल परीक्षेसाठी परीक्षा केंद्राची यादी राज्य मंडळ परीक्षा परिषदेमार्फत घोषित करण्यात येईल
अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा ही पूर्णतः येत असल्याने इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळ व परीक्षा परिषदेमार्फत पोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठीच्या पर्याय उपलब्ध करून देईल 2020 21 या शैक्षणिक वर्षासाठी दहावीच्या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी शुल्क अदा केलेली असल्याने अशा विद्यार्थ्यांना CET परीक्षा साठी शुल्क भरावे लागणार नाही . शिवाय सीबीएसई, आयसीएसई, व इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना या सीईटी परीक्षेसाठी राज्य मंडळाकडून परीक्षा परिषदेकडून शुल्क घेण्यात येईल.

विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर (प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक)

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.